भाजप जिल्हा सरचिटणीस आदिनाथ ताकटे व कार्यकर्त्यांचा आ. प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा! केला काँग्रेस पक्षात प्रवेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघ हा विशेष चर्चेत असून या ठिकाणी शिवाजीराव कर्डिले व महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे रिंगणात आहेत. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी सध्या प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

Ajay Patil
Published:
prajakt tanpure

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघ हा विशेष चर्चेत असून या ठिकाणी शिवाजीराव कर्डिले व महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे रिंगणात आहेत. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी सध्या प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

विशेष म्हणजे त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून मोठ्या प्रमाणावर तरुणांची साथ देखील त्यांना मिळताना दिसून येत आहे. अगदी याच पार्श्वभूमीवर जर आपण बघितले तर राहुरी विधानसभा मतदार संघामध्ये भाजपला झटका बसला असून

या ठिकाणी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून भाजपचे जिल्हा सरचिटणीस व कार्यकर्त्यांनी रावसाहेब तनपुरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार भाजपचे जिल्हा सरचिटणीस आदिनाथ ताकटे यांनी व्यक्त केला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश व प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व कार्यकर्त्यांनी रावसाहेब तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला व महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार भाजपचे जिल्हा सरचिटणीस आदिनाथ ताकटे यांनी व्यक्त केला आहे.

जर आपण राहुरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी भाजपाचे अनेक पदाधिकारी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करत असून याचा नक्कीच फायदा आमदार प्राजक्त तनपुरे यांना या निवडणुकीत होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

खडांबे बुद्रुक येथील भाजप पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आदिनाथ ताकटे यांनी समर्थकासह काँग्रेसचे रावसाहेब तनपुरे यांच्या हस्ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपमध्ये मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळात विकास मंडळाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या ठिकाणी रावसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाला बळकटी मिळत असताना खडांबे बुद्रुक येथील भाजप पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आदिनाथ ताकटे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरे यांची ताकद यामुळे या मतदारसंघात वाढण्यास मदत झाली आहे.

इतकेच नाही तर या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देणार असल्याचे देखील कार्यकर्त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe