सत्तेचा वापर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केला, लोकांचे प्रेम आणि विश्वास यावर ही निवडणूक जिंकेल! आ.प्राजक्त तनपुरेंचा विश्वास

राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी काल मतदारसंघातील अनेक गावांमध्ये प्रचार दौऱ्यांचे आयोजन केलेले होते व दररोज प्रचार दौरे व मतदारांशी गाठीभेटी व संवाद यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.

Ajay Patil
Published:
prakta tanpure

Ahilyanagar News:- राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी काल मतदारसंघातील अनेक गावांमध्ये प्रचार दौऱ्यांचे आयोजन केलेले होते व दररोज प्रचार दौरे व मतदारांशी गाठीभेटी व संवाद यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून येत आहे. सध्या त्यांनी केलेली विकास कामे यावर ते जनतेला सामोरे जात असल्याचे चित्र असून या प्रचार फेऱ्यांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद मिळताना देखील दिसून येत आहे.

याप्रकारे सोमवारी त्यांनी राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे, उंबरे तसेच मोकळोहोळ,चेडगाव, पिंपरी अवघड तसेच देशवंडी, राहुरी खुर्द, गोटुंबे आखाडा व सडे या गावांमध्ये प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आलेले होते. या फेरी दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केले.

विकासाची कामे केल्यानेच आपला विजय पक्का – आमदार प्राजक्त तनपुरे यांचा विश्वास
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहुरी विधानसभा मतदारसंघात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी प्रचार फेऱ्यांचे आयोजन केले असून काल त्यांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचार दौरा केला व त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की आपण सत्तेचा वापर फक्त तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केला.

विकासाची कामे केल्यामुळेच आपला विजय पक्का आहे असा दावा त्यांनी या निमित्ताने केला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की बुऱ्हाणनगर दौऱ्यावर असताना माझ्या काही कार्यकर्त्यांच्या गाड्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. विजय आपला हातून निसटतोय हे विरोधकांच्या लक्षात आल्यानेच आता त्यांनी अशा प्रकारची कृत्य केले असावे.

निवडणूक आता लोकशाही मार्गाने जिंकता येत नसल्याचे लक्षात आल्यावर आता कुठेतरी दडपशाही करून लोकांमध्ये दहशत पसरवायची अशी त्यांची खेळी दिसत आहे. परंतु जनता आता घाबरणार नाही व ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे व आपल्यालाही जशास तसे उत्तर देता येते. परंतु मी तसे करणार नाही.

लोकशाही पद्धतीनेच मी निवडणुकीला सामोरे जात असून गावोगावी भेटीगाठी सुरू आहेत. यामध्ये पाच वर्षात केलेली विकास कामे तसेच जनतेने दाखवलेला विश्वासास पात्र राहून अहोरात्र काम करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे लोकांच्या प्रेमावर तसेच विश्वासावर निवडणूक जिंकेल असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe