Ahilyanagar News:- सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे धामधूम आजपासून सुरू झाली असून आज राज्याच्या विविध भागांमध्ये दिग्गज नेत्यांच्या सभा आहेत. काल सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता व त्यानंतर आजपासून मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार हे तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या कालावधीत करताना आपल्याला दिसून येतील.
याच पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील मतदार संघामध्ये गाठीभेटी सुरू केले असून त्यांनी प्रचारात वेग घेतल्याचे सध्या दिसून येत आहे.
विशेष म्हणजे त्यांना गावा गावातील तरुण वर्गाचे पाठबळ मिळत असून अनेक तरुणांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाने पक्षप्रवेश केलेला आहे. त्यामुळे नक्कीच या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तरुण वर्गाचे पाठबळ त्यांना फायद्याचे ठरेल.
सर्व सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच माझे ध्येय- आमदार प्राजक्त तनपुरे
राहुरी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील तरुणांचे मोठे पाठबळ प्राजक्त तनपुरे यांना लाभत आहे. माझ्यावर विश्वास टाकत तरुणांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे व मतदार संघाचा नावलौकिक उंचावणार असा विश्वास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
पाथर्डी परिसरातील अनेक तरुणांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. या विधानसभा निवडणुकीमध्ये पाथर्डी परिसरातून कोणत्याही परिस्थितीत आमदार तनपुरे यांनाच मताधिक्य मिळणार असल्याचा दावा या निमित्ताने तरुणांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी लोहसर येथील अरुण गीते, शिवाजी वांढेकर तसेच दिनकर पालवे, मोहनराव गीते तसेच धर्मनाथ गीते, रावसाहेब गीते, सोमनाथ सानप तसेच बंडू दगडखैर, प्रशांत गीते इत्यादींनी शरद पवार गटात प्रवेश केला
व त्याशिवाय तिसगाव येथील प्रशांत गीते, अविनाश भास्कर, मन्सूर शेख, जाकीर सय्यद, प्रशांत नवगिरे इत्यादी तरुणांनी देखील शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. इतकेच नाही तर भोसे गावातील अनेक तरुणांनी देखील प्राजक्त तनपुरे यांना पाठिंबा देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.
भाजपचे तालुका युवक अध्यक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष यांनी केला शरद पवार गटात प्रवेश
इतकेच नाही तर भाजपचे तालुका युवक अध्यक्ष धीरज पानसंबळ यांच्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष नंदकुमार गागरे यांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.
विकास मंडळाचे अध्यक्ष तसेच काँग्रेस पक्षाचे रावसाहेब तनपुरे, उद्धव ठाकरे गटाचे रावसाहेब खेवरे यांनीही आमदार तनपुरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले.