आमदार प्राजक्त तनपुरे यांची अनोखी संकल्पना! राहुरी शहरात रंगणार आदिशक्ती आईचा जागर सोहळा; एक्स वन एक्स डान्स ग्रुप आहे सोहळ्याचे मुख्य आकर्षण

राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या अनोख्या संकल्पनेतून तुळजाभवानी मातेच्या पालखीचे माहेरघर असलेल्या राहुरी शहरामध्ये 5 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता डॉ. नेहे हॉस्पिटल शेजारील मैदानामध्ये आदिशक्तीचा जागर सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून या सोहळ्याला शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे अशा पद्धतीचे आवाहन आमदार प्राजक्ता दादा तनपुरे मित्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

Ajay Patil
Published:
prajakt tanpure

Ahmednagar News: आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आज आदिशक्ती आदिमायेचा संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये सोहळ्याला सुरुवात झाली व येणारे नऊ दिवस भाविक आईच्या चरणी लिन होण्याचा हा कालावधी असतो.

महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम रंगतात आणि जागरण सोहळ्यांचे आयोजन देखील या निमित्ताने केले जाते. सगळीकडे अगदी जल्लोषाचे असे वातावरण असते.

अगदी याच मुद्द्याला धरून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या अनोख्या संकल्पनेतून तुळजाभवानी मातेच्या पालखीचे माहेरघर असलेल्या राहुरी शहरामध्ये 5 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता डॉ. नेहे हॉस्पिटल शेजारील मैदानामध्ये आदिशक्तीचा जागर सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून या सोहळ्याला शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे अशा पद्धतीचे आवाहन आमदार प्राजक्ता दादा तनपुरे मित्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

 राहुरी शहरात रंगणार आदिशक्तीचा जागर सोहळा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या संकल्पनेतून तुळजाभवानी मातेच्या पालखीचे माहेरघर असलेल्या राहुरी शहरामध्ये 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता डॉ. नेहे हॉस्पिटल शेजारी असलेल्या मैदानामध्ये आदिशक्तीचा जागर सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार प्राजक्ता दादा तनपुरे मित्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.या 16 प्रसंगी जे महिला उपस्थित राहतील त्यांना नवरात्र उत्सव निमित्त फराळाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 मुंबईच्या इंडियाज गॉट टॅलेंट ग्रुपचे एक्स वन एक्स डान्स ग्रुप आहे मुख्य आकर्षण

आयोजित करण्यात आलेल्या या आदिशक्तीच्या जागर सोहळ्याचे जर प्रमुख आकर्षण पाहिले तर यामध्ये मुंबईच्या इंडियाज गॉट टॅलेंट ग्रुपचे एक्स वन एक्स डान्स ग्रुप सहभागी होणार असल्यामुळे हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या सोहळ्या प्रसंगी खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि आमदार प्राजक्ता तनपुरे यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे

त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता राहुरीतील स्टेशन रोडवरील डॉ. नेहे हॉस्पिटल जवळील मैदानावर आदिशक्तीचा जागर सोहळ्याला महिलांनी उपस्थिती लावावी अशा पद्धतीचे आवाहन करण्यात येत आहे.

या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष डॉ. सौ. उषा तनपुरे त्यासोबतच ओजस्विनी पतसंस्थेच्या संस्थापिका सुजाता तनपुरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष शारदा खुळे, राहुरी शहराध्यक्ष अपर्णा ढमाळ,

सोनाली तनपुरे आणि सायली तनपुरे यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून राहुरी शहर व तालुक्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे, अशा प्रकारचे आवाहन आमदार प्राजक्त दादा तनपुरे मित्र मंडळ च्या माध्यमातून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe