सर्वच शंकास्पद म्हणून बाबा आढाव यांचा आत्मक्लेश! खा. नीलेश लंके यांचे पुण्यात वक्तव्य

निवडणूकीत सर्वच शंकास्पद असल्याने बाबा आढाव यांना वयाच्या ९५ व्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन करावे लागल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा निवडणूकीमध्ये झालेल्या मोठया परिवर्तनावर शंका घेत बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केले.

Published on -

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत तांत्रीक गोष्टींमुळे अनेक उमेदवारांचा पराभव झाला आहे. या निवडणूकीत सर्वच शंकास्पद असल्याने बाबा आढाव यांना वयाच्या ९५ व्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन करावे लागल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा निवडणूकीमध्ये झालेल्या मोठया परिवर्तनावर शंका घेत बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केले.

खा. नीलेश लंके यांनी शनिवारी सायंकाळी बाबा आढाव यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.खा. लंके म्हणाले,अनेक मतदारसंघांमध्ये झालेले मतदान आणि ईव्हिएम मशिनवर आलेले मतदान यात तफावत आढळून आलेली आहे.

ज्या गावांमध्ये विरोधकांचे बुधही नव्हते, त्यांचा मतदान प्रतिनिधी नव्हता, तिथेही विरोधकांना मताधिक्य मिळाले आहे. या सर्व गोष्टी शंकास्पद गोष्टी आहेत. यामुळेच ९५ वर्षांचे असतानाही बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश केला.

याच कारणामुळे अनेक ठिकाणी लोक आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे खा. लंके म्हणाले.खा. लंके पुढे म्हणाले, बाबा आढाव यांच्यासोबत काही तज्ञ लोक आहेत. त्यांनी तर अतिशय धक्कादायक माहिती दिली आहे.

मतदानासाठी ईव्हिएम मशिन तयार करणाऱ्या कंपनीच्या तीन संचालकांमध्ये भाजपाचे गुजरात, बिहारचे माजी पदाधिकारी आहेत.अशा अनेक गोष्टी समाजापुढे येत असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

हक्काच्या गावांत ५०,१०० मतांची आघाडी

आमच्या मतदारसंघात अशी काही गावे होती तिथे आमच्या उमेदवाराना एक हजार, दिड हजार मतांचे लिड मिळणे अपेक्षित होते. तिथे प्रत्यक्षात ५०,१०० मतांची आघाडी मिळाली. आजही लोकांचा कौल घेतला तर आम्ही विरोधकाला मतदान केलेच नाही असे ते सांगत आहेत.

नीलेश लंके
खासदार, लोकसभा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!