बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्याची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी दिले-मा.आ.सुधीर तांबे यांचे प्रतिपादन

संगमनेर विधानसभा मतदारसंघ म्हटला म्हणजे हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघावर बाळासाहेब थोरात सातत्याने निवडून येत असून या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भरीव कामे त्यांनी केलेली आहेत.

Ajay Patil
Published:
balasaheb thorat

Ahilyanagar News:- संगमनेर विधानसभा मतदारसंघ म्हटला म्हणजे हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघावर बाळासाहेब थोरात सातत्याने निवडून येत असून या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भरीव कामे त्यांनी केलेली आहेत.

यावेळी त्यांची लढत प्रामुख्याने शिंदेसेनेचे अमोल खताळ यांच्याशी होत असून ही निवडणूक बाळासाहेब थोरात यांच्यासाठी खूपच सोपी समजली जात आहे. या मतदारसंघांमध्ये थोरात यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी व कुटुंब प्रचारात उतरले आहे.

शुक्रवारी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील जाखुरी तसेच पिंपरणे आणि अंभोरे येथील ग्रामस्थांशी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी नागरिकांशी संवाद साधला व त्यावेळी अनेक विषयांवर भाष्य केले.

थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण करू शेतकऱ्यांना पाणी दिले-मा.आ सुधीर तांबे यांचे प्रतिपादन
संगमनेर तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असून हीच परंपरा आमदार बाळासाहेब थोरात यांनी पुढे सुरू ठेवली आहे. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही व सर्व समाजाला बरोबर घेऊन प्रवास केला. निळवंडे धरण, कालव्यांची कामे पूर्ण करू शेतकऱ्यांना पाणी देण्यासोबतच त्यांनी कधीही भेदभाव केला नाही.

सर्व समाजाला बरोबर घेतले. निळवंडे धरण तसेच कालव्यांची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी देण्याबरोबरच त्यांनी सातत्याने गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

शुक्रवारी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील संगमनेर खुर्द तसेच जाखुरी, अंभोरे इत्यादी ठिकाणी ग्रामस्थांशी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी संवाद साधला व त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, जीवनाचा ध्यास मानून आमदार थोरात यांनी निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले.

मागच्या वर्षी दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याच्या माध्यमातून निळवंडे धरणाचे पाणी पोहोचले. कोरोना काळात देखील कालव्याची कामे सुरू होती व तेव्हा आमदार थोरात दररोज त्या कामांचा आढावा घेत होते व त्यांनी प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी देखील केली. त्यांच्याच कामामुळे निळवंडे धरण व कालव्यांची काम पूर्ण झाले असे देखील त्यांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe