BIG NEWS : सरकारचा मोठा निर्णय, शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- आताची एक मोठी बातमी. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. आता यापुढे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे.

निफाड तालुक्यात याबाबतच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. थकबाकीदारांना नोटीस पाठवूनही दुर्लक्ष होत असल्याने कारवाईला गती देण्यात आली आहे. आता सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’ लिहिण्याचे आदेश देण्यात आले आहे.

शेतसारा न भरल्यास आता शेतकऱ्याची शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. निफाड तालुक्यात थकबाकीदारांना वेळोवेळी नोटीस पाठवूनही खातेदार दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव लावण्याची कारवाई सुरु आहे.

निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांनी तालुक्यातील तलाठी कार्यालयांना असे आदेश दिलेत. शेतसारा बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ महसूल भरावा, असे आवाहन तलाठी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

मात्र, अद्याप जे शेतसारा भरणार नाही, अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव नोंदविण्यात येणार आहे. काही ठिकाणी ‘महाराष्ट्र शासन’ हे नाव सातबऱ्यावर चढविण्यात आले आहे.