Radhakrishna Vikhe Patil : भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आज बाळासाहेब ठाकरे असते तर ….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :-  भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केबलचं कनेक्शन देण्याइतकं एसटीचं काम अनिल परब यांना सोप्प वाटतं का?, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. (Radhakrishna Vikhe Patil)

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. अनिल परब याना मुंबईत केबल कनेक्शन दिल्यासारख एसटीचं काम सोप वाटत का? परब यांनी कधी एसटीमधून प्रवास केलाय का? कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या,

कुटुंबाचा आक्रोश पाहिल्यावर मंत्र्यांच्या आरत्या ओवाळयाच्या का?, असे सवाल करतानाच सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याचं मी समर्थन करतोस असं विखे-पाटील म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यातील ही पाहिलीच वेळ आहे. परिवहन मंत्री मीडियासमोर येऊन रोज बोलत आहेत. पण त्याला कोणताच आधार नाही.

आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कामगारांच्या बाजूने भूमिका घेतली असती, असं सांगतानाच राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांना अनिल देशमुख यांची पाठराखण करायला वेळ आहे.

मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्याना वेळ मिळत नाही ही राज्याची शोकांतिका आहे, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांचं नाव न घेता लगावला.

सरकार तुमचं आणि आरोप भाजपवर. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. भाजपवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही आझाद मैदानावर का गेला नाही? असा सवाल करतानाच तुम्ही स्वतःला काँग्रेसी नेता समजतात ना? मग बैठक बोलवा व निर्णय घ्या, असं आव्हानच त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिलं.