आ. रोहित पवारांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप करणाऱ्या कुंडलिक जायभाय यांच्यावर करणार कायदेशीर कारवाई- बारामती ॲग्रोच्या उपाध्यक्षांची माहिती

आमदार रोहित पवार यांनी आपले घर बांधण्याकरिता कर्जत येथील भांडेवाडी येथील जमीन खरेदी करून त्या जमिनीचे पैसे संबंधितांना दिले नाहीत व बारामती ॲग्रोने दिलेला चेक देखील बाऊन्स झाला असा आरोप कुंडलिक जायभाय व त्यांचा मुलगा कृष्णा जायभाय यांनी केला होता व या प्रकरणी कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे.

Published on -

Ahmednagar News: कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर नुकतीच कुंडलिक जायभाय यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केलेला होता. या प्रकरणांमध्ये आमदार रोहित पवार यांनी आपले घर बांधण्याकरिता कर्जत येथील भांडेवाडी येथील जमीन खरेदी करून त्या जमिनीचे पैसे संबंधितांना दिले नाहीत व बारामती ॲग्रोने दिलेला चेक देखील बाऊन्स झाला असा आरोप कुंडलिक जायभाय व त्यांचा मुलगा कृष्णा जायभाय यांनी केला होता व या प्रकरणी कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे.

या सगळ्या प्रकरणांमध्ये मात्र चेक बाउन्स झाल्याची खोटी माहिती देऊन मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम कुंडलिक जायभाय यांनी केले असून आम्ही त्याबाबत लवकरच कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष व एमडी सुभाष गुळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

. रोहित पवारांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप करणाऱ्या कुंडलिक जायभाय यांच्यावर होणार कायदेशीर कारवाई?

  आ. रोहित पवार यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघात चांगले काम सुरू असताना कुंडलिक जायभाय व त्यांच्या मुलाने चेक बाउन्स झाल्याची खोटी माहिती देऊन मतदारसंघातील जतनेची दिशाभूल करून आ. पवार व बारामती अॅग्रोची बदनामी करत आहेत. याबाबत आम्ही लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहोत, अशी माहिती बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष व एम. डी. सुभाष गुळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर प्रकरण कायदेशीर प्रक्रियेत असून, सदर चेक बाऊन्स झालेला नाही. त्याच्या पॅनकार्डवरील नावात बदल असल्याने बँकेने त्यांना चेक परत भरण्याचे पत्र दिले असून, त्याचे पैसे आम्ही देण्यास तयार आहोत, अशी माहिती बारामती अॅग्रोचे कायदेशीर सल्लागार अॅड. प्रसाद खारतुडे यांनी या वेळी दिली. कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांनी आपले घर बांधण्यासाठी कर्जत येथील भांडेवाडी येथील जमीन खरेदी करून त्याचे पैसे दिले नाहीत

व बारामती अॅग्रोचा चेक बाऊन्स झाला, असा आरोप करत कुंडलिक जायभाय व त्यांचा मुलगा कृष्णा जायभाय यांनी याप्रकरणी कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी आज (दि.२) रोजी आ. रोहित पवार व बारामती अॅग्रो यांच्या वतीने बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष व एम. डी. सुभाष गुळवे व बारामती अॅग्रोचे कायदेशीर सल्लागार अॅड. प्रसाद खारतुडे, यांनी हॉटेल भैरव ग्रैंड येथे पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची संपूर्ण हवा काढत हे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगितले.

बारामती अॅग्रो ही कंपनी सर्वत्र ज्या पद्धतीने जागा घेते त्याच पद्धतीने ही जागा खरेदी केली, ठरलेल्या रकमेचा चेक दिला गेला, तो त्यांनी ज्या दिवशी भरला, त्या दिवशी बारामती अॅग्रोच्या खात्यात असल्याने परत भरण्याचा शेरा मारून दिलेला होता. त्यामुळे कंपनीचा त्यांची फसवणूक करण्याचा उद्देश होता, हे या ठिकाणी सिद्धच होत नाही.

कारण त्यानंतर त्यांच्या खात्यात ५२ लाख रुपये पाठवले होते. मात्र, त्यांनी ते परत पाठवले. यामध्ये जो कालावधी गेला त्या दरम्यान सदर जागा कुल मुखत्यार पत्राद्वारे दुसऱ्यांना विकण्यात आली. जर आम्ही दिलेला चेक बाऊन्स झाला असता तर त्यांनी तीन महिन्यांच्या आत चेकबाबतची कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती, जी त्यांनी केली नाही.

सदर जागेचा ताबा जायभाय यांनी आम्हाला तेव्हाच दिला होता व त्यानंतर तो ताबा विक्री केलेल्या व्यक्तींना देण्यात आला आहे. कोर्टात या व्यक्तींनी आम्ही जागा विकणार नाहीत, हे मान्य केल्याने त्यावर कोर्टाने कोणतेही भाष्य केलेले नाही, अशी माहिती बारामती अॅग्रोचे कायदेशीर सल्लागार अॅड. प्रसाद खारतुडे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!