आ. संग्राम जगताप यांची ताकद वाढली! मिळाला शिख, पंजाबी, सिंधी आणि खंडेलवाल समाजाचा पाठिंबा

अहिल्यानगर शहरातील शीख, पंजाबी तसेच संधी व खंडेलवाल समाजाच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांना या निवडणुकीत पाठिंबा देण्यात आला व त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून हा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे.

Ajay Patil
Published:
sangram jagtap

Ahilyanagar News:- अहिल्यानगर शहरातील विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत असून विविध समाज घटकांकडून देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसून येत आहे व त्यामुळे नक्कीच या निवडणुकीत त्यांचे हात बळकट होतील अशी एक शक्यता आहे.

अहिल्यानगर शहरातील शीख, पंजाबी तसेच संधी व खंडेलवाल समाजाच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांना या निवडणुकीत पाठिंबा देण्यात आला व त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून हा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. यासंबंधीची महत्त्वपूर्ण बैठक शहरातील गुरुद्वारा दया सिंह सभा येथे माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली व या बैठकीत जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

आमदार संग्राम जगताप यांना शहरातील शीख, सिंधी तसेच खंडेलवाल समाजाचा पाठिंबा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्या नगर शहरातील शीख, पंजाबी तसेच सिंधी व खंडेलवाल या समाजाची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी अहिल्यानगर शहरातील गुरुद्वारा दया सिंह सभा येथे माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना शहरातील शीख,

सिंधी तसेच पंजाबी व खंडेलवाल समाजाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला व यावेळी शिख समाजाचे अध्यक्ष बलदेव सिंह याही, सिंधी समाजाचे अध्यक्ष महेश मध्यान, खंडेलवाल समाजाचे अध्यक्ष धोकरीया या इत्यादींनी आपल्या समाजाच्या वतीने उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार अरुण जगताप यांनी म्हटले की, वारकरी संप्रदाय जपणाऱ्या जगताप परिवाराच्या सर्व जातीधर्माशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध वर्षानुवर्ष जपले असून अहिल्यानगर शहरात विधानसभा निवडणुकीसाठी आमदार संग्राम जगताप यांना सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.

त्यामुळे आमदार संग्राम जगताप सर्व नागरिकांच्या पाठिंबावर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहेत. त्यांना मिळालेला शिख, पंजाबी तसेच सिंधी व खंडेलवाल समाजाचा पाठिंबा आमदार जगताप यांना मिळाल्याने या निवडणुकीत त्यांचे हात आणखीन बळकट होणार आहेत याबद्दल सर्व समाजाची आम्ही ऋणी आहोत असे देखील त्यांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe