Ahmednagar News :चुलत भावाचा चाकूने खून..! आरोपीला जन्मठेप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : भावाचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या आरोपी चुलत भावाला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश भुजंगराव पाटील यांनी गुरूवारी (दि.२२) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी फिर्यादी व मयताची भाची यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सहा वर्षांपूर्वी लोणी परिसरात प्रवरानगर येथे ही घटना घडली होती
.
याप्रकरणी कुणाल राजेंद्र भोसले याने वरील आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार, सुसार, १७ मे २०१८ रोजी सायंकाळी प्रवरानगर येथे जागरण गोंधळाचा कार्यकम चालू असताना रात्री ०८:१७ वाजेच्या सुमारास नरेंद्र राजेंद्र भोसले व त्याची भाची स्नेहल विलास चव्हाण हे घराकडे चालले असताना प्रवरानगर येथील आरोपी लाला रंजन भोसले याने त्या दोघांना अडविले व नरेंद्र यास शिवीगाळ करून मागील कारणावरून तुला आता संपवतोच, असे म्हणून त्याचे पोटात चाकूने वार केलेत.

त्यावेळी स्नेहल ही मध्ये पडली असता, तिच्या हातावर चाकूचा वार लागला. त्यामध्ये तिच्या हाताच्या शिरा कट होवून दोघे ही रक्त्तभंबाळ झाले. नरेंद्रचा उपचार सुरू असताना २२ मे २०१८ रोजी मृत्यू झाला.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक फौजदार एस. एन. माळी यांनी कोर्टकामी पैरवी केली.

प्रत्यक्षदर्शीची साक्ष ठरली महत्त्वाची

खटल्यावेळी, सरकारी वकील अशोक लक्ष्मण वहाडणे व सरकारी वकीलांचे लिपीक श्रीनिवास श्रीकांत जोशी यांनी १७ साक्षीदारांचे जबाब नोंदविले.

यामध्ये फिर्यादी कुणाल भोसलेसह स्नेहल चव्हाण या दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. कोर्टाने आरोपी लाला रंजन भोसले यास कलम ३०२, अन्वये जन्मठेपेची व १० हजार रूपये दंड,

दंड न भरल्यास तीन महिन्याची शिक्षा दिली. व कलम ३२४ अन्वये १ वर्षे शिक्षा व ५ हजार दंडाची शिक्षा दिली. दंड न भरल्यास १ महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.