जिल्हा बँक : दुसऱ्या दिवशी तिघा जणांचे अर्ज 

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-सहकार क्षेत्रातील लौकिक प्राप्त बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या काटेकोर नियोजनात सुरु झाली आहे.

काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तीन जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. कालच्या दुसऱ्या दिवसा अखेरीस एकूण चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच काल १६३ नामांकन पत्रांची विक्री झाली असून कालपर्यंत एकूण ३१६ नामांकन पत्रांची विक्री झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दि. २५ जानेवारी पर्यंत आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम नाम निर्देशन दाखल करणे :- दि. १९ ते दि.२५ जानेवारी (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत), छाननी- दि.२७ जानेवारी (सकाळी ११ वाजता),

वैध नाम निर्देशन यादी प्रसिद्ध- दि.२८ जानेवारी (सकाळी ११ वाजता), नामनिर्देशन माघारी मुदत -दि. २८ जानेवारी ते दि. ११ फेब्रुवारी ( सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत), चिन्ह वाटप व अंतीम उमेदवार यादी प्रसिद्धी – दि. १२ फेब्रुवारी (सकाळी ११),

मतदान- दि. २० फेब्रुवारी ( सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत, ठिकाण नंतर घोषित होणार ) आणि मतमोजणी दि. २१ फेबुवारी रोजी (ठिकाण व वेळ नंतर घोषित होणार)