अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान प्रशिक्षण! प्रत्येक प्रशिक्षणार्थीस मिळणार प्रतिदिन 1 हजार रुपये

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून 2024-25 या वर्षासाठी मनुष्यबळ विकास घटकांतर्गत संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून याकरिता तीन ते पाच दिवसाच्या निवासी प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रतिदिन एक हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Published on -

Ahilyanagar News:- शेतीमध्ये येऊ घातलेले तंत्रज्ञान तसेच पिकांचे उत्पादन कसे वाढवावे याबाबत अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आता विकसित झालेले आहे. पिकांच्या लागवडीपासून तर पिकांच्या काढणीपर्यंत व्यवस्थापन तसेच यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी करता यावा व शेतकऱ्यांना याबाबत माहिती मिळावी या उद्देशाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून 2024-25 या वर्षासाठी मनुष्यबळ विकास घटकांतर्गत संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून याकरिता तीन ते पाच दिवसाच्या निवासी प्रशिक्षणासाठी प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रतिदिन एक हजार रुपये देण्यात येणार आहेत.

तसेच या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शेतकरी तसेच क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिकांचे आयोजन व यशस्वी व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या जातात. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था,एनआयपीएचटी, तळेगाव दाभाडे या संस्थेमार्फत ठाणे तसेच पुणे, कोल्हापूर अमरावती विभाग येथे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

तसेच बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्र मार्फत, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था नाशिकचे आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, नागपूर येथील वरोरा, दापोली येथील हापूस आंबा गुणवत्ता केंद्र व पुणे येथील राहुरी डाळिंब गुणवत्ता केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्र, नागपूर येथील संत्रा गुणवत्ता केंद्र येथे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

कोणत्या विषयांवर मिळेल ट्रेनिंग?
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत फळे व भाजीपाला रोपवाटिका, कृषी व्यापारा बाबत धोरण व निर्यातीबाबत माहिती, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, ड्रॅगन फ्रुट व जिरेनियम तसेच नाविन्यपूर्ण पिकांच्या उत्पादनाचे तंत्रज्ञान, औषधी, सुगंधी व मसाला पिकांचे उत्पादन, प्रक्रिया व विपणन तसेच हरितगृह,

पॉलिहाऊस व्यवस्थापन, हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स, काढणीपश्चात व्यवस्थापन( फळे व भाजीपाला), पिकनिहाय लागवड व प्रक्रिया( डाळिंब,हळद व आले) या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तसेच शेतकऱ्यांना या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आवश्यक साहित्य तसेच चहापान, भोजन व निवास व्यवस्था आधी सुविधा करण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रशिक्षणासाठी जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!