बळीराजासाठी शनिवारी आयुक्तांच्या निवासस्थानासमोर उपोषण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्ववभूमीवर नगर जिल्ह्यात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वसेवा तसेच व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहे.

मात्र आता याच निर्बंधांमुळे प्रशासनाच्या विरोधात नागरिक संतापले आहे. याबाबत कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत वाकळे म्हणाले की, आपण दि.२ मे पासुन सलग १५ मे पर्यंत शेतमाल भाजीपाला विक्री बंदी लागु केलेली आहे.

आपण एकच दिवस अंशत: बंदी उठवत पुन्हा दि.१६ मे पासुन ती सुधारीत आदेश काढत ०१ जुन पर्यंत वाढवली आहे. आपल्या जिल्ह्यात शेतकरी मोठया कष्टाने कर्जभानगडी करून पिकवत असलेल्या शेतमाल तसाच पाडून राहतो आहे.

सध्या स्थितीला शेतकरी बि-बियाणे, खते विकत घेत पीक घेत आहे मात्र आलेले पीक विकता येत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. हि गोष्ट अत्यंत अन्यायकारक आहे. शहरात ‘वॉईन शॉप सुरू आहेत पण शेतक-यांना भाजीपाला विक्रीस बंदी आहे.

मनपा हद्दीतील शेतमाल ‘भाजीपाला विक्री बंदी’ उठवुन मार्केटयार्ड मधील फळे व भाजीपाला विक्री ‘संयुक्तपणे गर्दीचे नियमन’ करत सुरू करावी वरील प्रश्न आपण सोडविणार नसल्यास तर आम्ही आपल्या निवासस्थानी शनिवार दि.२२ मे २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून लाक्षणिक उपोषण सुरू करू. याची नोंद घ्यावी.असा इशारा यावेळी देण्यात आला.