लोणी परिसरात तीन आठवड्यांत पाचवा बिबट्या जेरबंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राहाता तालुक्‍यातील लोणी- बाभळेश्वर रस्त्यावरील शिवकांता मंगल कार्यालयालगत पाचवा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागास यश रविवारी आले.

बिबट्यांच्या अधिवसाची साखळीच यानिमित्ताने समोर येत आहे; मात्र अजूनही काही बिबटे येथे स्थिरावलेले आहेत.

लोणी ते बाभळेश्वर रस्त्यालगत डॉ. सुनिल निवृत्ती आहेर यांच्या गट नंबर १६२ मध्ये मक्‍याच्या शेतात साधारण एक वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाला. घटनेची माहिती रावसाहेब आहेर यांनी प्राणीमित्र विकास म्हस्के यांना देताच ते घटनास्थळी पोहोचले व वनविभागाच्या वरिष्ठांना माहिती दिली.

वनरक्षक गजेवार, डॉ. सुनील आहेर, प्रा. महेश आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली. लोणी सादतपूरसह बाभळेश्वर परिसरात धुमाकूळ घालणारा सलग पाचवा बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांसह वनविभागानेही काही अंशी सुटकेचा निःश्वास टाकला;

मात्र या परिसरसह कोल्हार भगवतीपूरमध्येही निबट्यांची दहशत अद्याप कायम आहे. संगमनेर तालुक्‍यातील व ‘लोणीजवळील सादतपूरमध्ये तीन, प्रवरानगर येथे एक तर आता बाभळेश्वर- लोणी रस्तावर एक असे पाच बिबटे वनविभागाने जेरबंद केले आहेत.

दि. २५ जानेवारीस पाच वर्षाचा चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडला होता. तत्पूर्वी लोणीत लहामागे कुटुंबियातील ९ वर्षाच्या मुलाचा या बळी बळी गेला गेला होता. एकापाठोपाठ घडलेल्या या घटनेमुळे लोणी, बाभळेश्वरसह प्रवरानगर व कोल्हार भगवतीपूर परिसरात खळबळ उडाली होती.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने सादतपुरसह लोणी परिसरात विविध ठिकाणी पिंजरे लावून तसेच ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेत होते. सोबत वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी ठाण मांडून होते. आज तिसरा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागला यश मिळाले आहे; मात्र परिसरात बिबट्याची दहशद कायम आहे.

कोल्हार- भगवतीपूर परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात पशूधन फस्त झाले आहे. चालत्या वाहनावर बसलेल्या वाहचालकांवर बिबट्या झेप घेत आहे. ग्रामस्थ व शेतकरी बिबट्याच्या दहशतीमध्येच शेती करीत आहेत. तर लोकवस्तीमध्येही बिबट्यांचा शिरकाव झाल्याने बिबट्यांचा उच्छाद वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने येथे पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करणे गरजेचे आहे.