अहमदनगर ब्रेकिंग : सरकारी ठेकेदारावर गोळीबार, पहा नगर जिल्ह्यात कोठे घडली घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News:पारनेर तालुक्यातील मांडओहोळ ते म्हसोबा झाप रोडवर सरकारी कंत्राटदार स्वप्निल जयसिंग आग्रे (वय २५ रा. म्हसोबा झाप) यांच्यावर दोघांकडून गोळीबार करण्यात आला.

आज दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. जखमी आग्रे यांना उपचारासाठी प्रथम टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गोळीबाराचे प्रकरण असल्याने तेथून नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

उपचार साठी दाखल करण्यात आले होते परंतु गोळीबारात गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

तेथे आग्रे यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखो दुचाकीवरून पळून गेले. हल्ल्याचे कारण नेमके कारण अद्याप समोर आले नाही. हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्याचे सांगण्यात आले.