उद्धव ठाकरे यांनी भाजपचं सगळंच काढलं ! म्हणाले आधी भ्रष्टाचाराबाबत आरडाओरड, आता…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : भ्रष्ट लोकांविरूद्ध भारतीय जनता पक्षाने आधी आरडाओरड केली. मात्र, त्यांनाच आता पक्षात घेतले आहे. त्यांचीच धुणी – भांडी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

त्यांनी माझे घर फोडले, हिंदुत्वाचा, शिवसेनेचा घात केला, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

उद्धव ठाकरे यांची बुधवारी संगमनेर, कोपरगाव येथे जनसंवाद यात्रा झाली. या सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आदी नेते उपस्थित होते.

संगमनेर येथील सभेत ठाकरे यांना तीन किलो वजनाची चांदीची गदा भेट दिली. ठाकरे यांचे आगमन होताच संगमनेरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ठाकरे यांचा काँग्रेसकडूनही सत्कार करण्यात आला.

कोपरगाव येथील सभेत बोलताना ठाकरे म्हणाले, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पक्ष सोडून गेले होते, ते परत आले. त्यांनी शिवसेना चोरली नाही.

परंतु. सध्याच्या खासदाराने गद्दारी करून शिवसेना चोरणाऱ्यांना साथ दिली. येणार्‍या ‘निवडणुकीत त्यांना जागा दाखवा. भाजपवाल्यांनी खासदार, आमदार फोडले. पण, त्यांना ज्यांनी निवडून दिले ते माझ्यासोबत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

घराणेशाहीबाबत ठाकरे म्हणाले, मोदींना आमची घराणेशाही खटकते. मात्र, मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे.

प्रबोधनकारांचा नातू, शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून मला किंमत आहे. माझ्या घराण्यावर प्रेम करणारी जनता आहे. शिवसेनाप्रमुखांनी त्यावेळी साथ दिली नसती तर मोदी आज दिसले नसते.

ज्या स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला, त्यांच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठीच तर शेतकरी आंदोलन करीत आहेत.

देशभक्त म्हणून एकत्र या, जात पात, धर्म बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र या कारण येणारी निवडणूक हुकूमशाह विरुद्ध लोकशाहीची असणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

स्थानिक नेते मातब्बर असूनही त्यांनी कोपरगावच्य पाण्याचा प्रश्न सोडविला नसल्याच खंत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली

संगमनेरात काँग्रेसकडून सत्कार
पक्षप्रपुख उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसकडून सत्कार करण्यात अला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे,

युवक काँग्रेस शहराध्यक्ष निखिल पापडेजा, एनएसवूआयचे तालुकाध्यक्ष गोव डोंगरे, माजी उपनगराध्यक्ष नितीन अपंग, शैलेश कलंत्री, तूरमोहप्मद शेख आदी यावेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलो-ठाकरे
माझ्याबरोबर भेकड भाकड नाहीत, तर लढाऊ मावळे असून, शेतकऱ्यांची लढाई लढण्यासाठी मी मैदानात उतरलोय, साथ द्या,’ असे आवाहन शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. अकोले येथील बाजार तळावर कुटुंब संवाद यात्रेनिमित्त ते बुधवारी जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार संजय राऊत, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब स्वेवरे, शुभांगी पाटील, महेश नवले, प्रदीप हासे, सुरेश गडाख, सुनीता भांगरे, अमित भांगरे, सतीश भांगरे, मच्छिंद्र धुमाळ, डॉ. संदीप कडलग, प्रमोद मंडलिक, मंगल शेलार, देवा नवले उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, ‘लोकसभेला पन्नास हजारांपेक्षा अधिक आघाडी अकोलेतून मिळेल, हे सभेच्या गर्दीतून दिसून येते. शिवसेनेचा आवाज कुणी दाबू शकत नाही. मनोज जरांगे-पाटील यांचे प्राण वाचवावे, ही उबाठासह सामान्य जनतेची भावना असून,

मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवावा. ईव्हीएम बाजूला हटवून निवडणुका घ्याव्यात. साधी अकोले ग्रामपंचायत त्यांना जिंकता येणार नाही. सभास्थळी येण्याअगोदर बसस्थानक परिसरात आठ-दहा जेसीबीच्या साह्याने उद्धव ठाकरे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.