अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे फेसबुक अकौंट हॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या मित्रांना फोन करून ५० हजार रुपये पाठवा, किमती फर्निचर देतो, असे सांगून फसवणूक करण्यात येत आहे. याबाबत कुणीही व्यवहार करू नये, असे भोसले यांनी सांगितले आहे.
भोसले यांचे मित्र असलेल्या अनेकांना अशाप्रकारे फोन येत आहेत. किमती फर्निचर भोसले यांनी तुम्हाला देण्यास सांगितले आहे, तुम्ही केवळ पन्नास हजार रुपये पाठवा. मी लगेच किमती फर्निचर तुम्हाला पाठवतो, असे सांगत काहींची फसवणूक केली आहे.
भोसले हे नगर जिल्ह्यात तीन वर्षे कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांशी त्यांचा संबंध आला होता. त्यांचे फेसबक्ततरील अकौंट एका व्यक्तीने हॅक केले आहे. संबंधित व्यक्तीने मोबाईल मध्ये असलेल्या मेसेंजर या अॅपमध्ये राजेंद्र भोसले यांचे प्रोफाइल बनविले आहे.
या मेसेंजरमधून भोसले यांच्या अनेक मित्रांशी संपर्क करत ख्याली खुशाली विचारण्याचे काम करत फर्निचर विकायचे असल्याचे सांगतो आहे. त्यातून काहींची फसवणूक झाली आहे.
दरम्यान, याबाबत माझे फेसबुक अकौंट हॅक झाले असल्याची तक्रार सायबर पोलिसांत दाखल केली आहे. माझे नाव सांगून कोणी कसलाही व्यवहार करत असेल तर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी भोसले यांनी केले आहे