जी.के. एन. सिंटर मेटल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने माणुसकीच्या भावनेने अनोखा उपक्रम.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-कोरोना च्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेडची मोठ्या प्रमाणात गरज भासत असल्याने जी.के. एन. सिंटर मेटल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने माणुसकीच्या भावनेने बूथ हॉस्पिटला नव्याने २० ऑक्सिजन बेड्स साठी ऑक्सिजन लाईन फिटिग करून

देण्याचे काम चालू करण्यात आले या कामाची पाहणी करताना कंपनीचे प्लांट डायरेक्टर पुरुषोत्तम ऋषी, एच.आर. डायरेक्टर बाबासाहेब खिलारी, सुनील राठी, अविनाश कुलकर्णी,

ऋषिकेश सुकाळे, रमेश म्हस्के, विठ्ठल हांडोरे, आनंद किलोर, सुभाष सुर्यवंशी, अंबादास वल्लाकट्टी, दत्ता साठे, अंकुश तोडमल आदी उपस्थित होते.

कंपनीचे प्लांट डायरेक्टर पुरुषोत्तम ऋषी म्हणाले की कोरोना च्या पहिल्या लाटेत बूथ हॉस्पिटल मध्ये हजारो रुग्ण बरे होऊन घरी परतले होते दुसऱ्या लाटेत बूथ हॉस्पिटलने सर्वसामान्य कोरोना रुग्णांसह ऑक्सीजन बेडची सेवा देण्यास सुरुवात केली होती

ती देखील कमी पडत असल्याने जी.के. एन सिंटर मेटल्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने वर्गणी करून अडीच लाख रुपयाच्या ऑक्सिजन लाइन फिटिंग चे काम करण्यात येत आहे व रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून अविरत सेवा देणाऱ्या

हॉस्पिटल्स पैकी नगरच्या बूथ हॉस्पिटल मध्ये अत्यंत कमी खर्चात उपचार दिले जात आहे व रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे.

हाच ताण हलका करण्यासाठी जी.के. एन सिंटर मेटल्स या कंपनीने बूथ हॉस्पिटल मध्ये २० बेड्स साठी ऑक्सिजन लाईन टाकून दिली. बूथ हॉस्पिटल मध्ये आधी २० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. परंतु वाढणाऱ्या रुग्णांमुळे आणि सध्याची परिस्थिती पाहता हे ऑक्सिजनचे बेड्स कमी पडत होते

त्यामुळे जी.के. एन सिंटर मेटल्स कडून ऑक्सिजनची लाईन टाकण्यात येणार असून हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या वाढली जाणार आहे.

व जी. के. एन सिंटर मेटल्स चे पुरुषोत्तम ऋषी यांनी सामाजिक बांधिलकीतून पैसे जमवून ही ऑक्सिजन ची लाईन टाकल्याचे सांगितले तसेच हॉस्पिटलचे मेजर देवदान कळकुंबे यांनी सर्वांचे आभार मानले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|