हृदयरोग संदर्भातील जटिल शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रवरा मेडीकल ट्रस्टने आज टाकलेले पाऊल हे ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा मैलाचा दगड ठरेल तसेच हार्ट ट्रान्सप्लांट करणारे ग्रामीण भागातील पहीले रुग्णालय ठरेल असा विश्वास देशातील सुप्रसिद्ध ह्दय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ राहुल चंडोला यांनी आज व्यक्त केले.
प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या हार्ट ट्रान्सप्लांट , बायपास , आणि व्हॅाल चेंनजींग सारख्या जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नविन ओपरेशन थियटरचे व आत्याधुनिक पोस्ट ओपरेशन पेंशट केअर आयसीयुचे उदघाटन डॉ राहुल चंडोला यांच्या हस्ते आज झाले यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ राजेंद्र विखे पाटील, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ राजवीर भलवार, डॉ रविंद्र मनेरिकर, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त धृव विखे पाटील, डॉ सतिश महाजन, डॉ एन. एस.पवार आदी मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी पुढे बोलतांना डॉ चंडोला यांनी ह्दय रोगा संदर्भातील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याची गरज आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या रुग्णालयाची गरज देशात अधिक आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्टने ग्रामीण भागात याचा पाया घातला आहे ही सामाजिक बांधिलकी निश्चीत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले .
यावेळी बोलतांना प्रवरा मेडीकल ट्रस्टचे चेअरमन डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या आरोग्यसुविधा देण्यासाठी प्रवरा मेडीकल ट्रस्टचा या शस्त्रक्रियासाठी सुविधा निर्माण करणे एक टप्पा असुन अजुन बरेच अंतर चालायचे आहे.
प्रवरा मेडिकल ट्रस्ट हे देशाच्या ग्रामीण भागातील एक प्रमुख केंद्र झाले पाहीजे यासाठी आमची प्रयत्न सुरु आहे ते लवकर पुर्ण होतील अशी आशा व्यक्त केली .यावेळी डॉ अक्षय शेट्टी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.