अहिल्यानगरमध्ये अवघे 15 सेकंद ठरले बंडखोरीला कारणीभूत! बैठकीत ठरले परंतु केंद्रावरच बिघडले; वाचा 15 सेकंदात घडलेली राजकीय घडामोडी

उद्धव सेनेचे तिघे बंडखोर अगदी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेण्यासाठी कार्यालयामध्ये पोहोचले. परंतु तिघांपैकी फक्त दोघांनीच अर्ज मागे घेतला व यापैकी शशिकांत गाडे यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवला. अर्ज दाखल करायला फक्त पंधरा सेकंद उशीर झाला व अवघ्या पंधरा सेकंदात शशिकांत गाडे यांची बंडखोरी कायम राहिली.

Ajay Patil
Published:
ahilyanagar

Ahilyanagar News:- काल विधानसभेसाठी उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस होता व बंडखोरी केलेल्यांची समजूत काढण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नाकी नऊ आले. राज्यातील बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक बंडखोरांना समजावण्यात महाविकास आघाडी व महायुतीला यश आले.

परंतु तरीदेखील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवत डोकेदुखी वाढवण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये माघारी घेण्यासाठी अनेक प्रकारच्या नाट्यमय घडामोडी घडून आल्या.

अगदी याच पद्धतीची अतिशय नाट्यमय घडामोड अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघांमध्ये घडली. या ठिकाणी उद्धव सेनेचे तिघे बंडखोर अगदी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेण्यासाठी कार्यालयामध्ये पोहोचले.

परंतु तिघांपैकी फक्त दोघांनीच अर्ज मागे घेतला व यापैकी शशिकांत गाडे यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवला. अर्ज दाखल करायला फक्त पंधरा सेकंद उशीर झाला व अवघ्या पंधरा सेकंदात शशिकांत गाडे यांची बंडखोरी कायम राहिली.

नेमके काय घडले काल?
काल अर्ज माघारीचा दिवस होता व उद्धव ठाकरे गटाचे तिघे बंडखोर अर्ज मागे घेण्यासाठी कार्यालयामध्ये पोहोचले. परंतु त्यातील फक्त दोघांनी अर्ज मागे घेतला व जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत गाडे यांना त्यांचा अर्ज दाखल करायला पंधरा सेकंद उशीर झाला व त्यामुळे त्यांची बंडखोरी कायम राहिली.

उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे अर्ज माघारी साठी केंद्रावर पोहोचले खरे पण जेव्हा ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जायला लागले तेव्हाच त्यांना कुणाचा तरी फोन आला. यावेळी ते कार्यालयाच्या बाहेरच फोनवर बोलायला थांबले.

त्या ठिकाणी सेनेचे पदाधिकारी जमले व त्यानंतर काही वेळातच माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे त्या ठिकाणी दाखल झाले. या तिघांमध्ये त्या ठिकाणी बराच वेळ चर्चा सुरू होती व निर्णय मात्र होत नव्हता.

या सगळ्या घडामोडी मध्ये अर्ज माघार घेण्यासाठी शेवटचे 15 सेकंद उरलेले असताना हे तिघेजण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेले. यामध्ये शशिकांत गाडे यांचा माघारीचा अर्ज गिरीश जाधव यांच्याकडे तयार होता.

परंतु तरी देखील शशिकांत गाडे यांना अर्ज दाखल करायला वेळ झाला. यामध्ये भगवान फुलसौंदर आणि बोराटे यांनी त्यांचे अर्ज मुदतीमध्ये मागे घेतले. परंतु शशिकांत गाडे यांचा अर्ज कायम राहिला.

सुवर्णा कोतकर यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला
या सगळ्या घडामोडी घडण्याअगोदर माजी उपमहापौर सुवर्ण कोतकर यांनी स्वतः तहसील कार्यालयामध्ये येऊन त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याची भूमिका स्पष्ट केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe