निळवंडे कालव्यासाठी त्यांच्या सरकारच्या काळात किती निधी आणला याचा हिशोब कर्डिले यांनी द्यावा, जनतेला फक्त झुलवत ठेवले-आ. प्राजक्त तनपुरेंचा आरोप

अहिल्या नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यामध्ये लढत होत असून प्राजक्त तनपुरे यांनी गावभेटींवर जोर देत मतदारांशी संवाद साधण्यावर मोठ्या प्रमाणावर भर देत असल्याचे दिसून येत आहे.

Ajay Patil
Published:
prajakt tanpure

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीमध्ये खरी लढत राज्यामध्ये महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये होत असून जवळपास सहा प्रमुख पक्ष या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून इतर छोटे मोठे पक्ष असे सगळे मिळून 12 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत व अपक्षांची संख्या देखील मोठी आहे.

त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत पक्ष असल्याची हे बहुदा पहिलीच निवडणूक असेल. त्यामुळे प्रत्येक उमेदवार हे मोठ्या प्रमाणावर प्रचार करत असून गाव भेटींवर जास्त करून जोर असल्याचे दिसून येत आहे.

याच प्रमाणे जर आपण अहिल्या नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यामध्ये लढत होत असून प्राजक्त तनपुरे यांनी गावभेटींवर जोर देत मतदारांशी संवाद साधण्यावर मोठ्या प्रमाणावर भर देत असल्याचे दिसून येत आहे.

याचाच भाग म्हणून शुक्रवारी त्यांनी तालुक्यातील कानगर येथे प्रचार दौरा आयोजित केला होता व यावेळी त्यांनी शिवाजी कर्डिले यांच्यावर निशाणा साधला.

सध्याचे सरकार शेतकरी विरोधी-आ. प्राजक्त तनपुरे
राज्यामध्ये या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता येणारच आहे. ज्याप्रमाणे लोकसभेच्या निकाल महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने आला अगदी त्याचीच पुनरावृत्ती आता विधानसभेत देखील दिसणार आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्तांतर घडणार आहे.

यामध्ये युवक व महिला सगळेजण अग्रेसर असल्याचे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातील कनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार दौऱ्या दरम्यान केले. यावेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दत्तात्रय गाडे होते. यावेळी बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले की, कनगर गावाचे आणि माझे एक वेगळे भावनिक नाते असून कुठल्याही कामाचे उद्घाटन करण्यापेक्षा काम करण्यात मला जास्त आवड आहे.

विरोधक फक्त भाषणबाजी करण्याचे काम करतात व प्रत्यक्षात त्यांचे काम मात्र शून्य आहे. गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेले एक तरी भरीव काम दाखवावे. असे आवाहन त्यांनी नाव न घेता शिवाजी कर्डिले यांना केले. तसेच भविष्यात शेतीसाठी दिवसा वीज देण्याचे काम करायचे आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघाला जवळपास 50 वर्षानंतर मंत्री पदाची संधी मिळाली व या मायबाप जनतेमुळेच मी मंत्री झालो हे मी कधीच विसरणार नाही. मंत्रीपदाचा वापर हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केला असं देखील त्यांनी म्हटले. तसेच शिवाजी कर्डिले यांच्या विषयी बोलताना त्यांनी म्हटले की निळवंडे कालव्यासाठी त्यांच्या सरकारच्या काळात किती निधी आणला याचा हिशोब त्यांनी द्यावा.

भाषणाच्या पलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही व जनतेला फक्त झुलवत ठेवण्याचे काम त्यांनी केले असा आरोप देखील त्यांनी यावेळी बोलताना केला. माझ्या मंत्रिपदाच्या कालावधीत मतदारसंघात भरभरून निधी आणण्याचे काम केले तसेच तुमच्या काळात शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर विकत घ्यावे लागत होते असा देखील आरोप त्यांनी कर्डिले यांच्यावर केला.

तसेच महायुती सरकारवर निशाणा जाताना त्यांनी म्हटले की, या सरकारने शेतीमालाचे भाव पाडण्याचे काम केले तसेच दुधाचे दर देखील कोसळले.

आता महाविकास आघाडी सरकार आल्यावर दिवसा वीज, निळवंडे धरणाच्या कालव्याच्या चारीची कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन रस्त्यांची कामे चालू करायचे आहेत असे देखील त्यांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe