Ahilyanagar News:- गेल्या कित्येक दिवसापासून रखडलेल्या आणि अनेक अपघातांना निमंत्रण देणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेला अहिल्यानगर ते मनमाड या महामार्गाचे काम मार्गी लागावे याकरिता खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची बुधवारी दिल्ली येथे जाऊन भेट घेतली
या सगळ्या महामार्गाच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा देखील केली. या भेटीदरम्यान खासदार निलेश लंके यांनी ज्या काही मागण्या केल्या त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून देण्यात आली.
अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाच्या कामाकरिता खासदार लंके यांची गडकरींशी भेट
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांची कामे तसेच बहुचर्चित अहिल्यानगर ते मनमाड रस्त्याच्या कामासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे 27 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे भेट घेऊन सगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या निमित्ताने खासदार लंके यांनी ज्या काही मागण्या मांडल्या त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीदरम्यान निलेश लंके यांनी नगर ते मनमाड रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेकडे लक्ष वेधले होते. तसेच त्यांनी नगर ते पाथर्डी रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी देखील नगर शहरामध्ये उपोषण केले होते.
या निमित्ताने अहिल्यानगर ते मनमाड रस्त्याचे काम मार्गी लावण्याची ग्वाही मंत्री गडकरी यांनी तेव्हा दिली होती. या रस्त्याच्या कामाची नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याने ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तेथे काँक्रिटीकरण करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केले असून मंत्री गडकरी यांनी ते मान्य केल्याची माहिती लंके यांच्या माध्यमातून देण्यात आली.
इतकेच नाहीतर अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील काही रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव देखील त्यांनी या बैठकीत सादर केले व त्या कामानबाबत मंत्री गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत पुढील कार्यवाही करण्यास सांगितल्याचे देखील लंके यांनी सांगितले.
तसेच इतर विभागातील प्रस्ताव सादर करण्यासाठी देखील खासदार निलेश लंके आता लवकरच मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले असून सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे व यादरम्यान खासदार निलेश लंके हे कामाला लागल्याचे दिसून येत आहे.