कोटीच्या कामात लाखोंचा मलिदा अधिका-यांनी लाटला ! देवदैठण येथील भारत सरकारच्या हर घर जल या योजनेला घर घर

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील भारत सरकारच्या हर घर जल या योजनेला घर घर लागली आहे. ग्रामपंचायत चे सांडपाणी जल-जिवन च्या विहरीत सोडल्याने ग्रामस्थामध्ये संतापाची लाट उसळली आहे.या बाबत येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश वाघमारे यांनी मा.जिल्हाधिकारी आणि सबंधित विभागाला तक्रार दाखल केली आहे.

देवदैठण येथील सिद्ध नदीवर झालेल्या ग्रामपंचायत मार्फत केंद्र सरकारच्या योजनेमधून जल जीवन योजनेच्या विहारीचे काम झाले आहे.सदर विहिरीचे काम चालू झाल्या पासून वेळोवेळी ग्रामपंचायतला सूचना दिल्या आहेत.मात्र ग्रामपंचायत मार्फत कुठलीही दखल घेतली गेली नाही. नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळण्यासाठी लाखो रुपये शासनाचे खर्च झाले आहेत.

अनेक वर्षापासून देवदैठण येथील सांडपाणी या सिद्ध नदीत सोडण्यात आले होते.सध्या जिथे हे सांडपाणी सोड्यात आले आहे त्याखाली शंभर फुटावर जल जिवनच्या विहारीचे काम झाले आहे.सोडण्यात आलेले दुषित पाणी सिद्ध नदीमधील वाळूत जिरून तेच पाणी विहरीत उतरत आहे.सांडपाणी सोडलेले जागा आणि जलजीवन विहारीची जागा या नजीक आहेत.

याबाबत ग्रामपंचायत ला माहिती असूनही शासनाचा निधी लाटण्यासाठी इथेच विहीर बांधकाम करण्यात आले.या मुळे भविष्यात नागरिकांना दूषित पाण्याला सामोरे जावे लागणार. ग्रामपंचायतने जाणूनबुजून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम केले आहे.सिद्ध नदीवरील जल जीवन विहरीचे कडेला सोडलेले सांडपाणी हे तेथेच जिरून त्यातूनच गावाला भाविष्यात पाणी पुरवठा होणार आहे.

सध्या अतिशय घाण आणि उग्र वास रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना येत आहे. यामुळे अधिकारी योजना पूर्ण करण्याची घाई करत आहे. हे पाणी भविष्यात जनावरे व कपडे धुण्यासाठी सुद्धा वापर होणार नाही. या पाण्यामुळे योजना चालू झाल्यास या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे. या बाबत संबधित खात्याच्या अधिका-यांना पत्र दिले आहे.सबंधित योजना ही गावाची आहे ग्रामस्थांना शुद्ध पाणी द्यावे सबंधित गटार लाईन हि विहारीच्या खाली लांब सोडावी जेणे करून दुषित पाणी विहरीत उतरणार नाही अशी तक्रार सतीश वाघमारे यांनी दिली आहे.

कोटीच्या कामात लाखोंचा मलिदा अधिका-यांनी लाटला

केंद्र सरकारच्या चांगल्या योजनेचे झालेले निकृष्ठ कामाला स्थानिक पदाधिकारी जबाबदार आहेत.कोटीच्या कामात लाखोंचा मलिदा अधिका-यांनी लाटला आहे.पुढील काही वर्षाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून हि योजना राबवली आहे.अधिकारी तक्रारीची दाखल घेत नाही.यामुळे जलजीवन नाही तर जनजीवन उध्वस्थ केले आहे.उपमुख्याधिकारी कार्यलय समोर बेमुदत उपोषण करणार . सतीश वाघमारे तक्रारदार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe