लॉरेन्स स्वामींची मोक्कातुन सुटका

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- मोक्का प्रकरणामध्ये कोठडीत असलेल्या लॉरेन्स स्वामी याला तत्काळ सोडून देण्याबाबतचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, भिंगार पोलीस ठाण्यात लॉरेस स्वामीविरोधात डिसेंबर 2020 मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी त्याला सिनेस्टाईल अटक केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या गुन्ह्यात स्वामी याला जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. दरम्यान पोलिसांनी त्याच्याविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवून तो मंजूर करून घेतला होता.

मोक्काच्या गुन्ह्यात स्वामीला 20 जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मोक्का आदेशाविरोधात अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. सतीश गुगळे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात अपील करण्यात आले होते. यावर सुनावणी घेण्यात आली व स्वामी याची मोक्का गुन्ह्यातून मुक्तता करण्याबाबतचे आदेश न्यायालयाने दिले.