‘त्या’चॅम्पियनशीपमध्ये मोदींना प्रत्येकवेळी सुवर्णपदक मिळेल ! काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची टीका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जर खोट्या लोकांची जर वर्ल्ड चॅम्पियनशीप असेल तर त्यात मोदींना प्रत्येकवेळी सुवर्णपदक मिळेल. त्यांना हरवणे केवळ अशक्य असेल.

अशी टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. केरळच्या दोन मासेमारांना केरळच्या किनाऱ्याजवळ मारुन टाकल्याच्या प्रकरणावर सुरू असलेला खटला बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

केरळच्या किनाऱ्याजवळ दोन मासेमारांना मारुन टाकल्याचा आरोप दोन इटालियन खलाशांवर होता. या प्रकरणाची सुनावणीही सुरू होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने भारतातील ही सुनावणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात आता इटलीच्या कायद्यानुसार त्याच देशामध्ये पुढील कारवाई होणार आहे.

यावरुनच काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला असून, खोटे बोलण्यासाठी मोदींना नोबेल मिळायला हवे, अशी टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे. पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी यांनी ही कारवाई सौम्यप्रकारे चालली असल्याची टीका करत सोनिया गांधींवर जोरदार टीका केली होती.

पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर एनडीए सरकारने मौन बाळगल्याप्रकरणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले असून दिग्विजय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. या निर्णयानंतर नरेंद्र मोदींचं एक जुनं ट्विट व्हायरल होत आहे.

एका युजरच्या ट्विटला उत्तर देत दिग्विजय सिंह यांनी खोटे बोलण्याच्या बाबतीत मोदींना फक्त नोबेलच मिळणार नाही, तर खोट्या लोकांची जर वर्ल्ड चॅम्पियनशीप असेल तर त्यात मोदींना प्रत्येकवेळी सुवर्णपदक मिळेल. त्यांना हरवणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.

दहशतवाद, हुकुमशाही आणि हिंसक अतिरेकामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून मूल्यांचे रक्षण करण्यासाठी भारत ‘जी-७’ राष्ट्रांचा सहयोगी असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केली. लंडनमध्ये होत असलेल्या

‘जी-७’ राष्ट्रांच्या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींनी व्हर्चुअल माध्यमातून सहभाग घेऊन भारताची भूमिका मांडली. महत्त्वाचे म्हणजे मोदींनी केलेल्या ‘ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स’ (ट्रीप्स) करारातून सूट देण्याच्या आवाहनाला ऑस्ट्रेलियानेही समर्थन दिले. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe