Ahmednagar News: जिल्ह्यातील ज्ञानेश्वर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली व या सभेमध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी काही आरोप केले. या सभेवेळी बोलताना त्यांनी म्हटले की,जिल्ह्यातील जे काही इतर साखर कारखाने आहेत त्यांनी शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे रुपये प्रति टन इतका दर दिलेला आहे.
परंतु ज्ञानेश्वर व मुळा साखर कारखान्याने मात्र शेतकऱ्यांना 2700 रुपये प्रति टन असा दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलेले आहे. यामुळे ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली असल्याच्या आरोप माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला.
तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस असून देखील त्याची तोड कारखान्याने केली नाही व बाहेरच्या कार्यक्षेत्रातून ऊस आणून त्या ऊसाला 2800 ते तीन हजार रुपये दर दिला जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याकडून शेतकऱ्यांची ऊस दरामध्ये फसवणुकीचा माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा
जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी ३२०० रुपये प्रतिटनापर्यंत भाव दिला. परंतु ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याने मात्र २७०० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पोसली. ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे, असा आरोप माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला.
ज्ञानेश्वर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुरकुटे म्हणाले, कार्यक्षेत्रात ऊस असूनही त्याची तोड न करता बाहेरून ऊस आणत जात आहे. या उसाला २८०० ते ३००० रुपयेभाव दिला जात आहे.
मात्र शेतकऱ्यांना २७०० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. ज्ञानेश्वर व मुळा कारखाने कर्जबाजरी झाले असून टाळेबंदमध्ये मात्र स्थावर किंमत वाढवून दाखवल्यामुळे कारखान्याची परिस्थिती कागदावर चांगली दिसते.
कारखान्याच्या तिजोरीतून निवडणुका शेतकऱ्यांच्या जीवावर केल्या जातात. वारेमाप पैशांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या या कामधेनू संकटात टाकल्या. हे कारखाने त्यांनी कर्जबाजारी केले. जेव्हा शेतकऱ्यांना काही देण्याची वेळ येते.
तेव्हा मात्र साहेब, भाऊ म्हणून घेणाऱ्यांचे तोंड मात्र मूक गिळून गप्प असते, असा टोला मुरकुटे यांनी लगावला. येणाऱ्या गळिताचा भाव कारखान्याने जाहीर न केल्याने व मागील वर्षातील दिवाळीसाठी शेतकऱ्यांना कुठलीही तरतूद न केल्याने मुरकुटे यांनी कारखाना व्यवस्थापनाचा निषेध व्यक्त केला.
कामगारांना वर्षभर पगार न देणे म्हणजे हा त्यांच्यावर अन्याय आहे. कामगारांचे शोषण करणे म्हणजे स्वतःचे घरे भरून कामगारांना वाऱ्यावर सोडणे आहे. दिवाळीला २० टक्के बोनस देणे परंपरा असताना १३ टक्के बोनस देऊन बोळवण करण्याचा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली.