नगर जिल्ह्यातील नगरपंचायत तसेच नगरपालिकांना मिळणार मोठा निधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन 2021-22 वर्षातील अनुदानाचा राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना पहिला हप्ता प्राप्त झाला. (Nagar Panchayat)

यामध्ये तब्बल184 कोटी 40 लाख रुपयांचा भरघोस निधी प्राप्त झाला आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनपासह सर्व पालिका आणि नगरपंचायतींच्या 9 कोटी 29 लाख 19 हजार 131 रुपयांच्या निधीचा समावेश आहे.

अनुदानाचे वाटप कसे होणार? जाणून घ्या अहमदनगर मनपा 3 कोटी 5 लाख 34 हजार 498 रुपये,

शिर्डी नगरपंचायत 33 लाख 385 रुपये, जामखेड नगरपरिषद 48 लाख 45 हजार 953 रुपये,

अकोले नगरपंचायत 19 लाख 69 हजार 746 रुपये, कर्जत 27 लाख 15 हजार 142 रुपये,

पारनेर 24 लाख 1 हजार 834 रुपये, शेवगाव 46 लाख 27 हजार 258,

श्रीरामपूर नगरपरिषद 76 लाख 33 हजार 623 रुपये,

संगमनेर नगरपरिषद 58 लाख 56 हजार 116 रुपये,

कोपरगाव नगरपरिषद 56 लाख 74 हजार 384 रुपये,

राहुरी नगरपरिषद 42 लाख 33 हजार 250 रुपये,

राहाता पिंपळस नगरपरिषद 23 लाख 86 हजार 717 रुपये,

श्रीगोंदा नगरपरिषद 46 लाख 22 हजार 783 रुपये,

देवळाली 36 लाख 14 हजार 643 रुपये,

पाथर्डी 30 लाख, 60 हजार 229 रुपये,

नेवासा नगरपरिषद 27 लाख 20 हजार 859 रुपये,

अहमदनगर कटकमंडळ 27 लाख 21 हजार 711 रुपये.