Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीचा काल शेवटचा दिवस होता व काल अहिल्यानगर जिल्ह्यातून साधारणपणे 108 जणांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली असून कोपरगाव, कर्जत जामखेड तसेच संगमनेर आणि राहुरी हे चार विधानसभा मतदारसंघ सोडले तर इतर आठ मतदारसंघांमध्ये मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासमोर बंडखोरांचे आव्हान राहणारा असून ते नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे.
श्रीगोंदा मधून भाजपच्या माध्यमातून प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली होती व त्यांनी त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची मागणी केलेली होती.
परंतु भाजपा पक्षश्रेष्ठींकडून प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आलेली होती. अखेर काल श्रीगोंदयातून प्रतिभा पाचपुते यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला व आता त्यांचे पुत्र विक्रम सिंह पाचपुते त्या ठिकाणाहून भाजपचे उमेदवार असतील.
कोणी घेतले अर्ज मागे आणि कोणी ठेवले कायम?
1- अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघ- या ठिकाणी महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप उमेदवार असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर असणार आहेत. परंतु या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे शशिकांत गाडे यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.
दुसरे म्हणजे माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता. परंतु त्यांनी काल माघार घेतली. त्यामुळे आता अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप, अभिषेक कळमकर आणि शशिकांत गाडे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
2- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ- या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांचे आवाहन आहे व त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचे देखील आव्हान असणार आहे.
तसे पाहायला गेले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊसाहेब कांबळे यांना अर्ज मागे घ्यायला सांगितले होते. परंतु शेवटच्या दिवशी भाऊसाहेब कांबळे नॉट रिचेबल राहिले व त्यांचा अर्ज कायम राहिला.
3- अकोले विधानसभा मतदारसंघ- या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉ. किरण लहामटे व शरद पवार गटाचे अमित भांगरे यांच्यात लढत होईल असे वाटत होते. परंतु या ठिकाणी माजी आमदार वैभव पिचड यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण झाली आहे.
तसेच मधुकर तळपाडे यांनी देखील महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी केली आहे. माजी आमदार वैभव पिचड यांनी अर्ज मागे घेण्याची तयारी केलेली होती. परंतु त्यांच्या समर्थकांनी याला विरोध केल्यामुळे त्यांनी अर्ज कायम ठेवल्याचे बोलले जात आहे.
4- शिर्डी विधानसभा मतदारसंघ- या ठिकाणी नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. महायुतीतील बंडखोरी टाळण्याकरिता भाजपने डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांना खास विमान पाठवून मुंबईला बोलावले.
परंतु तरी देखील त्यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली व आता त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर महायुतीच्याच बंडखोर उमेदवाराचे आव्हान राहणार आहे.
5- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ- या ठिकाणी भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली होती. परंतु नंतर पाचपुते कुटुंबाने विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला. काल प्रतिभा पाचपुते यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला व आता विक्रमसिंह पाचपुते त्या ठिकाणी उमेदवार राहणार असून त्यांच्यापुढे ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे,
माजी आमदार राहुल जगताप व अण्णा शेलार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. तसेच अन्य पक्षाचे उमेदवार व अपक्ष उमेदवार देखील या ठिकाणी कायम असून त्यांचे देखील आव्हान राहणार आहे. या ठिकाणी अनेक दिग्गज उमेदवारांनी बंडखोरी केल्यामुळे चौरंगी लढत होताना दिसत आहे.
5- संगमनेर विधानसभा मतदारसंघ- या ठिकाणी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ, वंचितचे अजित वोहरा, मनसेचे योगेश सूर्यवंशी या प्रमुख उमेदवारांचे आव्हान असणार आहे.
आपल्याला माहित आहे की,संगमनेर विधानसभा मतदार संघ माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अतिशय प्रतिष्ठेचा केला होता. भाजपाकडून त्यांना या ठिकाणाहून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु हा मतदारसंघ शिंदे गटाकडे गेला.