भाजपची सत्ता कशी येईल, यासाठीचे नियोजन आतापासूनच सुरू – आमदार राधाकृष्ण विखे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : कार्यकर्त्यांनी संघटीतपणे चांगले काम केले, तर नगरपरिषदेमध्ये भाजपाची सत्ता येण्यास कोणतीही अडचण नाही.

त्यासाठी इतर कोणाशीही फिक्सिंग न करता, शतप्रतीशत भाजपची सत्ता कशी येईल, यासाठीचे नियोजन आतापासूनच सुरू आहे, असे आवाहन आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले आहे.

श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील सर्व शक्तीप्रमुख आणि बुथप्रमुखांचा मेळावा आमदार विखे यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष दीपक पठारे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, सुनील वाणी, नानासाहेब शिंदे, शरद नवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार विखे म्हणाले, केंद्र सरकाने देशातील जनतेला कोविड संकटात मदत केली. मोफत लसीकरण झाल्यामुळे देश आत्मनिर्भरतेने पुढे जात आहे. राज्य सरकार फक्त लस खरेदी करण्याच्या घोषणा करीत राहिले. आता महाविकास आघाडी सरकारच यासर्व योजनांचा श्रेय घेत असल्याची टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेसाठी ७८ योजना राबवून गोरगरीबांना न्याय दिला आहे. केंद्र सरकाने देशातील जनतेला भरभरून दिले आहे. आता त्यांना साथ देण्याची वेळ आली असल्याचे सूचित करून

श्रीरामपूर नगरपालिकेतध्ये भाजपला एकहाती सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटीबद्ध व्हावे, असे आवाहन आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले. श्रीरामपूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी केंद्राच्या योजना बूथ कमिटीच्या माध्यमातून गावागावात पोहोचवाव्यात, असे आवाहन केले.