Ahmednagar News: अहमदनगर अर्बन बँकेतील कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल होऊन जवळपास अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला असून या प्रकरणांमध्ये फॉरेन्सिक ऑडिट होऊन त्यानुसार 105 आरोपी निष्पन्न झाले व त्यापैकी केवळ दहा ते बारा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे या आरोपींमध्ये नगर अर्बन बँकेच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जवळपास या प्रकरणामुळे नगर अर्बन बँक एक वर्षापासून बंद आहे. परंतु अजून देखील या प्रकरणात पोलीस तपास हव्या त्या वेगाने होऊ शकलेला नाही.
नगर अर्बन बँकेतील कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणांमध्ये पोलीस तपासावर राजकीय व्यक्तींचा दबाव असल्यामुळे तपास हा धिम्या गतीने सुरू असल्याचा आरोप अर्बन बँक बचाव कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
अर्बन बँक घोटाळा प्रकरणात पोलीस तपासावर राजकीय शक्तींचा दबाव– अर्बन बँक बचाव कृती समितीचा आरोप
नगर अर्बन बँकेतील कर्जगैरव्यवहार व घोटाळा प्रकरणात पोलिस तपासावर राजकीय शक्तीचा दबाव असल्याने तपास धीम्या गतीने सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत आरोपी असलेले बँकेचे संचालक, कर्जदार अशांच्या ४८ मालमत्ता जप्त केल्या.
मात्र त्याची जप्ती व लिलाव प्रक्रियेसाठी त्या अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्या गेल्या नाहीत. परिणामी ठेवीदारांचे पैसे मिळण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप अर्बन बँक बचाव कृती समितीने केला आहे.
बँकेच्या सद्य परिस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे डी. एम. कुलकर्णी यांनी हा आरोप केला. यावेळी अॅड. अच्युत पिंगळे, राजेंद्र गांधी आदी उपस्थित होते.
पोलिसांची प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी दिवाळीनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर ठेवीदारांचा मोर्चा नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बँकेतील कर्जगैरव्यवहार व घोटाळ्याचा गुन्हा दाखल होऊन अडीच वर्षांचा अधिक कालावधी झाला
मात्र “फॉरेन्सिक ऑडिट’ ‘नुसार निष्पन्न झालेल्या १०५ आरोपींपैकी केवळ १० ते १२ जणांना अटक झाली आहे. आरोर्पीमध्ये बँकेच्या अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी येत्या आठ दिवसात पोलिसांना शरण यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
बँक बंद पडून जवळपास एक वर्षाचा कालावधी झाला. मात्र नगर पोलिस दलाकडून कोणतीच गंभीर व आश्वासकृती होत नाही. ४८ मालमत्ता जप्त करण्यात आल्या तरी त्यावर अन्य वित्तीय संस्थांचे बोजे आहेत का, याचा शोध घेण्याचे काम दिरंगाईने सुरू आहे. बँक बचाव समिती सर्व दोषींना शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच ठेवेल.