निवडणुकीच्या कारणावरून ह्या गावात दोन गटात राडा

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथे दि.१८ रोजी ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरून दोन गटात राडा झाल्याने परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .

माळवाडी गाडगे याच्या घरासमोर दि.१८ रोजी दुपारी १ वाजता फिर्यादी निलेश तात्याभाऊ दिवटे, अंकुश गाडगे, विशाल गाडगे, विकास गाडगे यांना ग्रा.पं. उमेदवार मिनाबाई भास्कर गाडगे यांना मतदान न केल्याच्या कारणावरून आरोपी आबासाहेब सोनबा गाडगे, सुभाष सोनबा गाडगे,

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

छबन सोनबा गाडगे व सतोष दादाभाऊ गाडगे (सर्व रा.माळवाडी बाबुर्डी ता.पारनेर) यांनी फिर्यादिंना तू आमच्या जागेवरील टपरी काढून टाक नाहीतर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली.

आबासाहेब गाडगे याने काठी विकास गाडगे याचे डोक्यात मारली, सुभाष गाडगेने विशाल गाडगेच्या डोक्यात दगड घातला, छबन गाडगे ने अंकुश गाडगेस काठीने मारहाण केली. संतोष गाडगे याने फिर्यादीच्या डोक्यात मारून साक्षीदाराना गंभीर जखमी केले काठीने व दगडाने जीवे मारण्याचे उद्देशाने मारहाण केली.

फिर्यादी निलेश तात्याभाऊ दिवटे (वय ३० व्यवसाय – सुपा टोल नाका सुपरवायजर रा.सामान मळा, बाबुर्डी) यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक स.फौ.कोसे पुढील तपास करत आहेत. दुसरी फिर्याद सुभाष सोनबा गाडगे (वय ५५ व्यवसाय शेती रा विठ्ठलवाडी बाबुर्डी ता.पारनेर) यांनी दिली असून

दि. १८ रोजी दुपारी १ वाजता आरोपी विकास नारायण गाडगे, विशाल नारायण गाडगे, निलेश तात्याभाऊ दिवटे , अंकुश भाऊसाहेब गाडगे, नंदाबाई नारायण गाडगे (सर्व रा बाबुर्डी ता.पारनेर) यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना उमेदवार नंदाबाई नारायण गाडगे या पराभूत झाल्याचा राग आल्याने व समाईक जागेत टपरी उभी केल्याचे कारणावरून तसेच आरोपीनी

जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश असतान ही गैरकायद्याची मंडळी एकत्रीत जमवून संगणमत करून फिर्यादी व साक्षीदारांना लाकडी दांडक्याने, लाथा बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुभाष गाडगे, आबा गाडगे जखमी झाले आहेत.