Ahilyanagar News:- राहुरी विधानसभा मतदार संघामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्राजक्त तनपुरे हे रिंगणात आहेत व त्यांच्यापुढे महायुतीकडून शिवाजी कर्डिले यांचे आवाहन आहे. मात्र राहुरी विधानसभा मतदारसंघात आमदार प्राजक्त तनपुरे यांना मोठ्या प्रमाणावर विविध समाज घटक तसेच तरुणांकडून पाठिंबा मिळताना दिसून येत असून प्रचारात त्यांनी सध्या वेग घेतल्याचे चित्र आहे.
बुधवारी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले होते व या प्रचार सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी प्राजक्त तनपुरे यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची ग्वाही राहुरीकरांना दिल्याचे दिसून आले.
तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी, कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी- शरद पवार
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले होते व या प्रचार सभेला जेष्ठ नेते शरद पवार यांनी संबोधले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की फोडाफोडीमुळे लोकसभेत भाजपला जनतेने नाकारले आहे व आता विधानसभेला देखील तीच जनता भाजपला नाकारेल आणि राज्यांमध्ये सत्तांतर होईल.
प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी आता राहुरीकरांनी घ्यावी. त्यानंतर मात्र कॅबिनेटमध्ये स्थान देण्याचे जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही देखील श्रेष्ठ नेते शरद पवार यांनी या निमित्ताने दिली. यावेळी बोलताना पुढे पवार म्हणाले की, राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष फोडले व सत्ता मिळवण्याचे काम केले.
परंतु भाजपाचे हे जे काही कृत्य आहे ते राज्यातील जनतेला पटलेले व रुचलले नाही याचेच प्रत्यंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. महाराष्ट्रामध्ये फोडाफोडी करणाऱ्या भाजपाला जनतेने सपशेल नाकारले आहे व तीच जनता विधानसभेत देखील भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना कोणत्याही परिस्थितीवर सत्तेवर येऊ देणार नाही.
मी संपूर्ण राज्यात दौरे केले असून राज्यात सत्तांतर होणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. आमदार तनपुरे यांना राहुरीकरांनी भरभरून साथ देण्याची गरज आहे व महाविकास आघाडी शासन काळात नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय झाला व तेव्हा देखील मी तनपुरे यांचे नाव अगोदर घेतले होते.
तनपुरे यांनी देखील माझ्या विश्वासाला तडा न जाऊ देता सहा खात्यांवर आपल्या कामाचा ठसा उमटवला व चांगल्या कामाची दखल घेत त्यांना येणाऱ्या काळात चांगली जागा देण्याची जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही देखील पवार यांनी दिली.