माझ्या वडिलांवर कोणी पातळी सोडून बोलाल तर याद राखा, बोलणाऱ्याला तेथेच गाडून टाकेन- डॉ.सुजय विखे पाटील यांचे आव्हान

काल संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे रविवारी रात्री युवा संवाद यात्रेदरम्यान सभा पार पडली व यावेळी डॉ.सुजय विखे पाटील काही मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की,माझे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जर कोणी खालच्या पातळीत बोलत असेल तर याद राखावी, टायगर अभी जिंदा है.

Ajay Patil
Published:
sujay vikhe patil

Ahilyanagar News:- संगमनेर मध्ये जयश्री थोरात यांच्याबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे झालेल्या वादामुळे त्या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर थोरात आणि विखे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत असून एकमेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेली आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर काल संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे रविवारी रात्री युवा संवाद यात्रेदरम्यान सभा पार पडली व यावेळी डॉ.सुजय विखे पाटील काही मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की,माझे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जर कोणी खालच्या पातळीत बोलत असेल तर याद राखावी, टायगर अभी जिंदा है.

बोलणाऱ्याला तेथेच काढून टाकीन अशा प्रकारचे आव्हान देखील त्यांनी बोलताना केले. धांदरफळ बुद्रुक येथील सभा आटपून घरी परतणाऱ्या विखे समर्थकांना जी काही मारहाण करण्यात आलेली होती व त्यांचे वाहन जाळून इतर वाहनांची देखील तोडफोड करण्यात आलेले होते.

ही सगळी वाहने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळली व फोडली असा आरोप विखे पाटील यांनी केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या समर्थक कसे बोलतात त्याचे व्हिडिओ देखील त्यांनी या सभेमध्ये दाखवले. इतकेच नाहीतर अंभोरे येथे पार पडलेल्या सभेमध्ये त्यांनी धांदरफळ येथील सभेनंतर घरी जाणाऱ्या युवकांना कशा पद्धतीने मारहाण झाली याचे व्हिडिओ देखील स्क्रीनवर दाखवले.

 भाषणादरम्यान डॉ. सुजय विखे पाटील झाले भावुक

अंभोरे येथे झालेल्या सभेवेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील भावुक झाल्याचे देखील दिसून आले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की,माझ्या सभेला आलेल्यांना मार खावा लागला व याबद्दल वाईट वाटले असे सांगत त्यांना भाषणा दरम्यान अक्षरशा रडू कोसळले.

यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की,मला मारण्याकरिता आमदार बाळासाहेब थोरात यांचे बंधू इंद्रजीत थोरात यांनी सर्व कटकारस्थान रचल्याचा आरोप देखील त्यांनी केला. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांच्यावर त्यांनी निशाणा साधला व म्हटले की, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ज्यांची निवडून यायची पात्रता नाही तेही आमच्यावर टीका करतात.

डोक्यावर पडलेला,कानफाडात लावील असे ते आणि त्यांचे कार्यकर्ते बोलतात व हाच त्यांचा सुसंस्कृतपणा आहे का? आमचे संस्कृती काढून राज्यात बदनामी केली.

पण आमच्या मतदारसंघात येऊन माझ्या वडिलांबद्दल वाटते ते बोलतात व ज्यांचे ग्रामपंचायतीत निवडून यायची लायकी नाही ते देखील बोलतात आणि या तालुक्याचे आमदार हसतात व हीच तुमची संस्कृती आहे का? देखील प्रश्न डॉक्टर विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe