Ahilyanagar News:- महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात व त्यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना,सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अशा अनेक योजनांचा उल्लेख आपल्याला करता येईल.
या योजना या घटकांसाठी खूप महत्त्वाच्या असून काही ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येते.
अगदी याच योजनांच्या अनुषंगाने जर बघितले तर या विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून सप्टेंबर 2024 च्या शेवटपर्यंत संगमनेर तालुक्यातील एकूण 11614 लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास एक कोटी 65 लाख 20 हजार 100 रुपये वर्ग करण्यात आल्याची महत्वपूर्ण माहिती संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्यावर आहे संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपदाची जबाबदारी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व राज्याचे माजी महसूल मंत्री व अहिल्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमोल खताळ यांच्यावर संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकलेली आहे
व खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील वृद्ध निराधार तसेच गरीब,दिव्यांग,विधवा आणि परीतकत्या बंधू आणि भगिनींना या सगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गावागावांमध्ये शिबिरांचे आयोजन केले होते.
कोणत्या योजनेचे किती लाभार्थ्यांच्या खात्यावर किती जमा झाले पैसे?
सप्टेंबर 2024 अखेर संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती या प्रवर्गातील जवळपास 620 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात नऊ लाख 22 हजार दोनशे रुपये, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती 265 लाभार्थ्यांना तीन लाख 99 हजार रुपये,
श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण या प्रवर्गातून 5379 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 80 लाख 83 हजार पाचशे रुपये, श्रावण बाळ गट ब सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती या प्रवर्गातील 685 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दहा लाख 27 हजार पाचशे रुपये,
श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती प्रवर्गातील 323 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर चार लाख 84 हजार पाचशे रुपये, श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे एकूण चार हजार तीनशे पस्तीस लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 56 लाख 3400 असे एकूण एक कोटी 65 लाख 20 हजार 100 रुपये वर्ग करण्यात आले असल्याची माहिती नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी दिली.