शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत जनाधार गमावला! राज्याचे वाटोळे न करता त्यांनी घरी बसावे; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पवारांवर निशाणा

पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो व त्या ठिकाणी देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर झटका बसला. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा शरदचंद्र पवार यांच्या करिष्मा संपला की काय अशी स्थिती आहे. जवळपास संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शरद पवार यांना जे काही अपयश आले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा करिष्मा संपला असे म्हणण्याला वाव आहे.

Ajay Patil
Published:
vikhe and pawar

Ahilyanagar News:- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने अतुलनीय असे यश मिळवले व या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा राज्यातून सुपडा साफ झाल्याचे आपण बघितले. या निवडणुकीच्या निकालांच्या निमित्ताने जर आपण शरद पवार यांच्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर त्यांचा करिष्मा महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला का? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.

कारण पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो व त्या ठिकाणी देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर झटका बसला. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा शरदचंद्र पवार यांच्या करिष्मा संपला की काय अशी स्थिती आहे. जवळपास संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शरद पवार यांना जे काही अपयश आले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा करिष्मा संपला असे म्हणण्याला वाव आहे.

याच स्थितीवर भाष्य करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला व त्यांनी म्हटले की, जाणता राजा असणाऱ्या शरद पवारांना विधानसभा निवडणुकीमध्ये जनाधार गमावला आहे व त्यामुळे आता त्यांनी राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी असावे.

गुरुवारी लोणी येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती व त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील?
यावेळी बोलताना त्यांनी पुढे म्हटले की, झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होतेव सत्तेत असलेल्या महायुतीची मात्र लोकसभेत पीछेहाट झाली होती. परंतु त्यावेळी ईव्हीएम वर कोणीही शंका उपस्थित केली नाही.

ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज होती व निवडणूक नाकारण्याची देखील गरज होती. जनमत बाजूला असले की ईव्हीएम चांगली, जनमत विरोधात गेले की ईव्हीएम वाईट अशी विरोधाकांची सध्या गत झाल्याचे देखील त्यांनी म्हटले.

तसेच मंत्रिपदांबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रामध्ये जे काही आता संभाव्य मंत्रीपदे अस्तित्वात येतील त्याचा संपूर्ण अधिकार देवेंद्र फडणवीस यांनाच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे वेगळे काही मागण्याची गरज नाही. पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास असून त्यानुसार ते मला चांगली जबाबदारी देतील याविषयी माझ्या मनात शंका नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.

तसेच विखे पाटलांनी यावेळी एकनाथ शिंदे नाराज असल्याचे दावे देखील फेटाळून लावले. त्यावर बोलताना त्यांनी म्हटले की,एकनाथ शिंदे नाराज असल्याचे रान प्रामुख्याने माध्यमांनी उठवले आहे.

परंतु ते नाराज असण्याची कुठल्याही प्रकारचे कारण नाही. भाजप जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे त्यांनी स्वतः सांगितले असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe