शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या स्मृतीस्थळी चादर अर्पण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-अहमदनगर शहराच्या 531 व्या स्थापना दिनानिमित्त हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांचे स्मृतीस्थळ (कबर) असलेले बागरोजा येथे चादर अर्पण करण्यात आली.

यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, उबेद शेख, अन्सार सय्यद, जुनेद शेख, सुहास मुळे, दिलावर सय्यद, नवेद शेख, रमीज शेख, अदनान शेख, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, डॉ.रिजवान अहेमद,

हमजा चुडीवाला, वहाब सय्यद, नईम सरदार, समीर मन्यार आदी उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, देशात अनेक शहरे आहेत. मात्र अहमदनगर शहराला एक स्थापना दिन असून, त्याचा दरवर्षी वर्धापन दिन साजरा होतो. हे या ऐतिहासिक शहराचे वैशिष्टये आहे.

इतिहासाचे जतन करुन विकसाचे पर्व गाठायचे आहे. विकसीत शहराच्या दिशेने कार्य सुरु आहे. पुरातत्व विभागाकडून मंजूरी मिळण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली असून, मंजुरीनंतर बागरोजाकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम मार्गी लावण्यात येणार आहे.

ऐतिहासिक वास्तुसंग्राहलयाचे नुतणीकरण झाले आहे. जगातील दुर्मिळ वस्तू व वेगळेपणा या शहरात आहे. नगरकरांनी शहराचा इतिहास जाणून शहराप्रती आपुलकी व आस्मिता जोपासावी. नगरकरांनी कोरोनाशी धैर्याने लढा देऊन एमकेकांना मदतीचा हात दिला.

यातून शहरातील एकता स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नगरकरांनी सहकार्य करुन संयम दाखवला आहे. नियमांचे पालन करुन कोरोनावर मात करता येणार आहे.

शहरात अनेक विकासात्मक कामे करण्याची संधी मिळाली. यासाठी आमदारांचे चांगले सहकार्य मिळाले. नगरकरांची मान उंचावेल अशी विकासकामे करु शकलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मन्सूर शेख यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील बारा वर्षापासून शहर स्थापना दिन साजरा केला जात आहे.

शहराप्रती आदर व आपुलकी ठेऊन दरवर्षी कार्यक्रम घेतला जातो. यामध्ये खंड पडू दिला नसून, मागील दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम साध्या पध्दतीने साजरा केल्याचे त्यांनी सांगितले.

हरजितसिंह वधवा यांनी शहराचा स्थापना दिन सर्व समाजाला जोडणारा उपक्रम आहे. शहराला कर्तबगारी व शौर्याची वारसा लाभला आहे.

कोरोनाशी लढा देत हे संकट देखील परतवून लावण्यासाठी नगरकर सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त अमोल बागुल यांनी बहारदार बासरी वादन करुन यावेळी शहराचे संस्थापक अहमद बादशाह यांना आदरांजली वाहिली.