अहमदनगरमध्ये शिवजयंती दणक्यात; शिवप्रेमींविरूध्द गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar News :- शासनाने लागू केलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना नगर शहर पोलिसांकडून शिवजयंती साजरी करणार्‍या मंडळास दिल्या होत्या.

मिरवणूकीला परवानगी नाकरण्यात आली होती. भादंवि कलम 149 नुसार मंडळास नोटीसा देण्यात आल्या होत्या. परंतू पोलिसांचा आदेश न जुमानता शिवजयंती मिरवणूक काढण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिरवणूक काढणार्‍या आठ मंडळाच्या अध्यक्षासह व डिजे मालक, चालक अशा 16 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188, 269, पर्यावरण, ध्वनी प्रदुषण अधिनियम अन्वये गुन्हा करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई उमेश दगडू शेरकर यांनी फिर्याद दिली आहे. शिवसेना शहरप्रमुख संभाजी अशोकराव कदम (रा. माळीवाडा, अहमदनगर), निखील सुभाषलाल गांधी, सचिन पाराजी दिवटे, विशाल यशवंत जाधव, दिनेश दत्तात्रय खरपुडे, निखील कैलास गहिले, बंटी ऊर्फ करण सुनील ढापसे, विशाल मच्छिंद्र शिरवाळे, गणेश ज्ञानेश्‍वर मोरे (सर्व रा. अहमदनगर),

अनिल मारूती साठे (रा. कराड जि. सातारा), प्रमोद तुकाराम पवार (फुरसुंगी, पुणे), अरबाज हामिद शेख (राजगुरूनगर, पुणे), घनश्याम दत्तात्रय बोडखे (रा. बुर्‍हाणनगर ता. नगर), वैभव विठ्ठल बोरकर (रा. लोणी काळभोर, पुणे), किरण राजाराम गावडे (रा. कर्जत), ज्योतिबा राजु कोकिटकर (रा. निपाणी, कोल्हापुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दरम्यान पोलिसांचे आदेश न जुमनता शिवसेना, भाजपासह इतर मंडळांनी डिजेच्या आवाजात मिरवणूक काढली. यावेळी हजारो शिवप्रेमी सहभागी झाले होते. रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणुक सुरू होती.