विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने त्यांच्याकडे फक्त पाचपुते परिवारावर टीका करण्याचे काम: विक्रमसिंह पाचपुते यांचे प्रतिपादन

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पूर्ण जिल्ह्यातच नाही तर राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. या ठिकाणी भाजपाने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु त्यांनी त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी म्हणून थेट मुंबई गाठत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यासंबंधीची मागणी केली होती.

Ajay Patil
Published:
vikaram pachpute

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पूर्ण जिल्ह्यातच नाही तर राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. या ठिकाणी भाजपाने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु त्यांनी त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी म्हणून थेट मुंबई गाठत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यासंबंधीची मागणी केली होती.

परंतु पक्षश्रेष्ठींनी प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी कायम ठेवत विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी देण्यास नकार दिला होता. परंतु अखेरीस उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रतिभा पाचपुते यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला व विक्रम सिंह पाचपुते यांची उमेदवारी कायम राहिली. त्यामुळे आता श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार म्हणून विक्रम पाचपुते रिंगणात आहेत.

त्यांनी आता प्रचारात वेग घेतला असून गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधण्यावर त्यांनी सगळा भर दिल्याचे आपल्याला दिसून येत आहे. काल त्यांनी प्रचारानिमित्त नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील परिसराचा प्रचार दौरा केला व यानिमित्ताने मतदारांशी संवाद साधला.

या प्रचारादरम्यान आठवड गावातील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांनी यावेळी म्हटले की विधानसभा निवडणुकीला मी विकासाच्या मुद्द्यावर सामोरा जात आहे. विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नसल्यामुळे त्यांच्याकडे फक्त पाचपुते परिवारावर टीका करण्याचेच काम त्यांच्याकडे शिल्लक असल्याचा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला.

विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार: विक्रमसिंह पाचपुते
श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांनी गाव भेटी सुरू केले असून मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. याच प्रकारे काल त्यांनी नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील परिसराचा प्रचार दौरा केला व आठवड गावातील मतदारांशी संवाद साधला.

या संवाद दरम्यान त्यांनी म्हटले की, या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर मी सामोरा जात असून विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नसल्यामुळे पाचपुते परिवारावर टीका करत असल्याचा टोला देखील विक्रम पाचपुते यांनी यादरम्यान लगावला.

विक्रम पाचपुते यांनी नगर तालुक्यातील चिंचोली पाटील परिसराचा प्रचार दौरा बुधवारी केला व यावेळी आठवडा गावातील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, मागील पाच वर्षात आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली आहेत

त्यामुळे विकास कोण करू शकतो हे जनतेने ओळखले असल्यामुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर मात्र विरोधकांकडे कोणत्याही प्रकारचा विकासाचा मुद्दा नाही व त्यामुळे फक्त पाचपुते परिवारावर टीका करण्याचे काम ते करत आहेत.

या मतदारसंघाचा विकासाचा गाडा आणखी पुढे घेऊन जाण्याकरिता मतदारांनी महायुतीला साथ द्यावी अशा प्रकारचे आवाहन देखील या निमित्ताने त्यांनी केले. या दरम्यान भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe