Sujay Vikhe News : डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या एका मताच्या अधिकारामुळे लोकशाही मजबूत आहे – खा.सुजय विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sujay Vikhe News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर यांना या देशाला दिलेले संविधान ही देशासाठी मोठी देणगी आहे. त्याच बरोबर संविधाने दिलेला सर्वांना समान एक मताचा अधिकार यामुळे देशाची लोकशाही मजबूत आहे. तिला कधीच धोका निर्माण होऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एक विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे एक व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणाऱ्या बाबासाहेबांना माझे अभिवादन आहे. अशा शब्दात अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. ते आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्यातील सिद्धार्थनगर डिकसळ, येथील एका कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. सुजय विखे यांच्यासह आमदार प्रा राम शिंदे तसेच विविध प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते. त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या चांगल्यासाठी जीवन समर्पिक केलं. तसेच असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते शेतीपर्यंत. सर्वच क्षेत्रात आपल्याला बाबसाहेबांचे काम दिसून येईल. खऱ्या अर्थाने महामानव असलेले बाबासाहेब हे भारतात जन्माला आले हे भारताचे भाग्य आहे. अशा महामानवाला मी शतश: नमन करतो. असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचार दौऱ्यावर विविध गावांना गाठीभेटी करत आहेत. विकास हेच माझे ध्येय असे सांगत, पंतप्रधान मोदींच्या काळात झालेल्या कामांची माहिती ते लोकांना देत आहेत. त्याच बरोबर आपण खासदार असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यातून जिल्ह्यासाठी आणलेला निधी आणि त्यातून झालेली कामे यांची माहिती ते लोकांना देत आहेत. त्यांच्या प्रचारात विरोधकांवर कोणत्याही टीका टिप्पण्या नसल्याने त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अहिल्यानगर परिसरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. ठिकठिकाणी मिरवणुका, प्रबोधनात्मक कार्यक्रमाला डॉ. सुजय विखे पाटील भेटी देत आहेत.