शेवगाव शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करा ! अन्यथा महिलांचा पाण्याच्या टाकीवर…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : शेवगाव शहराला किमान दिवसाआड पाणी पुरवठा करावा तसेच शहरासाठी मंजूर झालेल्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरीत सुरु करावे अन्यथा ४ डिसेंबर रोजी महिला पाण्याच्या टाकीवर जाऊन निषेध आंदोलन करतील,

असा इशारा शहरातील महिला कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबधितांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

सुमारे पन्नास हजार लोकवस्तीच्या तालुक्याचे ठिकाण असलेल्या शेवगाव शहरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. शहराला दिवसाआड पाणी मिळावे तसेच शहरासाठी नव्याने

स्वतंत्र झालेल्या पाणीपुरवठा योजेनेचा लवकरात लवकर शुभारंभ व्हावा, नगरपरिषदेने हे काम छत्रपती संभाजीनगरच्या एका नामांकित संस्थेस सुमारे पाच महिन्यापूर्वी दिले.

मात्र, सदरच्या संस्थेने अजूनही हे काम सुरू केलेले नाही, त्या कामास गती देण्यात यावी तसेच गेल्या अनेक वर्षापासून शहरात कधी बारा दिवसांनी तर कधी पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांना विशेषतः महिलांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

सध्याची पाण्याची पाईपलाईन अतिशय जीर्ण झाल्याने अनेकदा गटारीचे पाणी पाईपलाईनमध्ये उतरून हे गढूळ पाणी पिण्यासाठी येत असल्याने डेंगू व इतर साथीच्या आजारांचा वाढता धोका दूर व्हावा, यासाठी नगरपरिषदेच्या स्तरावरून योग्य ती

सुधारणा व्हावी, शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करून शेवगावकरांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत दिलासा मिळावा, आदी मागण्यांचे निवेदन शहरातील वेगवेगळ्या प्रभागातील महिलांनी येथील नगरपरिषदेसह सर्व संबंधितांना मंगळवारी दिले.

याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय झाला नाही तर येत्या ४ डिसेंबर रोजी शहरातील भूमी अभिलेख कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून महिलांच्या वतीने निषेध आंदोलन पुकारण्याचा निर्धार, करण्यात आला आहे. स्नेहल फुंदे,

सीमा बोरुडे, जयश्री काथवटे, शोभा शिनगारे, बालिका फुंदे, स्विटी शिनगारे, मीना काथवटे, सविता धनवट, मोना शिनगारे, आदींसह महिलांची या वेळी उपस्थिती होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe