Money Plant Tips : वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात कुठे ठेवावा ? जाणून घ्या विशेष टिप्स

Published on -

Money Plant Tips : मनी प्लांट ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ घराला सुंदर आणि आकर्षक बनवतेच नाही तर वास्तुशास्त्रानुसार आर्थिक समृद्धीचे प्रतीक मानली जाते. अनेक लोक घरात किंवा बागेत मनी प्लांट लावतात, पण काही दिवसांनी ती कोरडी पडते किंवा पूर्णतः सुकून जाते. योग्य पद्धतीने लावल्यास आणि काळजी घेतल्यास मनी प्लांट दीर्घकाळ तजेलदार राहू शकतो.

मनी प्लांट मातीत कसा लावावा ?

जर तुम्ही मातीमध्ये मनी प्लांट लावण्याचा विचार करत असाल, तर माती योग्य प्रकारे तयार करणे महत्त्वाचे आहे. कोकोपीट आणि सेंद्रिय खत मिसळून भांड्यात चांगली सुपीक माती तयार करावी. मनी प्लांटची कटिंग लावताना लक्षात ठेवा की पानांचा भाग जमिनीच्या वर राहील. यामुळे वनस्पतीला हवा आणि प्रकाश पुरेसा मिळेल.

मनी प्लांट टिकवण्यासाठी दररोज माती ओलसर राहील एवढेच पाणी द्यावे, मात्र अती पाणी टाकल्यास मुळे सडू शकतात. त्याचप्रमाणे, मनी प्लांट जिथे ठेवला आहे, तिथे पुरेसा सूर्यप्रकाश मिळतोय का याची खात्री करा. थेट उन्हात ठेवल्यास पाने जळू शकतात, त्यामुळे हलक्या सूर्यप्रकाशात आणि हवेशीर ठिकाणी ठेवणे सर्वोत्तम आहे.

पाण्यात मनी प्लांट कसा लावावा ?

मनी प्लांट पाण्यात उगवण्यासाठी योग्य कटिंग निवडणे गरजेचे आहे. कमीत कमी दोन ते तीन नोड्स असलेल्या फांद्या घ्याव्यात. बाटली किंवा ग्लासमध्ये भरपूर शुद्ध किंवा फिल्टर केलेले पाणी घालावे, जेणेकरून झाडाच्या खालच्या भागाला भरपूर पोषण मिळेल.

मनी प्लांटसाठी पाण्याची विशेष काळजी घ्यावी. दर 10 ते 15 दिवसांनी पाणी बदलणे आवश्यक आहे. तसेच, झाड थेट सूर्यप्रकाशात ठेऊ नका, कारण त्यामुळे त्याचे पानं कोरडी होण्याची शक्यता असते.

मनी प्लांट सुकणार नाही यासाठी विशेष टिप्स

  1. कोरडी आणि खराब झालेली पाने वेळेवर काढून टाका, यामुळे झाड अधिक चांगल्या प्रकारे वाढू शकते.
  2. रासायनिक खतांचा अधिक वापर टाळा. नैसर्गिक सेंद्रिय खत वापरल्यास झाडाची वाढ जलद होते.
  3. हवेचा योग्य प्रवाह झाडापर्यंत पोहोचेल याची खात्री करा.
  4. जर मनी प्लांट मातीमध्ये असेल, तर दर महिन्याला त्याची माती बदलणे फायद्याचे ठरेल.
  5. जर मनी प्लांट पाण्यात वाढवत असाल, तर बाटली किंवा ग्लास स्वच्छ ठेवा आणि पाणी वेळोवेळी बदला.

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात कुठे ठेवावा ?

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. ही दिशा धन आणि समृद्धीचे प्रतीक असल्याने आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मनी प्लांट याच दिशेला ठेवणे योग्य ठरते. घराच्या उत्तर-पूर्व भागात मनी प्लांट ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, त्यामुळे अशी चूक करू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!