माहिती लपवणाऱ्या त्या डॉक्टरवर कारवाई करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-कोरोना रुग्णांची माहिती लपवून ठेवणाऱ्या डॉक्टरवर कठोर कारवाई करा,असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुका प्रशासनास दिले. बाधित रुग्णांची माहिती देणे आवश्यक आहे.

माहिती न दिल्यास या संसर्गाचा प्रसार वाढणार आहे त्यासाठी प्रशासनाने प्रथम खाजगी डॉक्टरांना माहिती देण्याचे आवाहन करावे, असे त्यांनी सुचित केले. जिल्हाधिकारी भोसले यांनी शुक्रवारी सायंकाळी भातकुडगाव येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे, गट विकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी संकल्प लोणकर, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, श्रीकांत गोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मल्हारी ईसारवाडे, आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर,

वैद्यकीय अधिकारी सुप्रिया लुणे, अशोक वाघमोडे, वसंत घुमरे, कल्याण काळे, माजी सरपंच राजेश फटांगरे, संजय कोळगे, बाबासाहेब जमधडे, सोपान वडणे, राजेंद्र लोमटे, चंदू फटांगरे, अमोल नजन, पाराजी नजन, सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, कामगार तलाठी गणेश लोखंडे, ग्राम विकास अधिकारी दिलदार बागवान,

अर्जुन वाघमोडे, बापू वाघमोडे, आरोग्य सेविका व कर्मचारी उपस्थित होते. भातकुडगाव येथे रुग्णांची संख्या वाढल्याने ग्रामपंचायतने दहा दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी भेट देऊन प्रतिबंधक उपाययोजनाची पाहणी केली.

नागरिकांनी कोरोनाचे पालन करावे. लवकर उपचार झाले तर रुग्ण बरा होईल. पंधरा दिवसांत हे गाव कोरोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथील शाळेत ५० खाटांचे कोविड केअर सेंटर तातडीने सुरु करण्याचे आदेश देत गावातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या.