टीईटी घोटाळा ! डेरेंच्या ‘सुखमय’ निवासस्थानाची तब्बल 72 तासांपासून सुरु होते झाडाझडती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- राज्यात सध्या केवळ आणि केवळ घोटाळे गाजू लागले आहे. दरदिवशी यामध्ये काहीनाकाही घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.(TET Exam Scam)

दरम्यान नुकतेच राज्यात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

या घोटाळ्यातील आरोपी संगमनेर येथील रहिवासी सुखदेव डेरे यांच्या संगमनेर येथील ‘सुखमय’ या निवासस्थानाची तब्बल तीन तास झाडाझडती घेण्यात आली.

महत्वपूर्ण माहिती तपासी अधिकार्‍यांच्या हाती लागली असून त्यांनी दोन लाखांची रक्कम हस्तगत केल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे येथील सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कदिर देशमुख यांच्या पथकाने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे तात्कालीन संचालक सुखदेव डेरे यांच्या निवासाची तपासणी केली.

टीईटी पेपरफुटी नंतर आता कृषी सेवक पदभरती घोटाळ्याचे धागेदोरे देखील महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे तत्कालीन संचालक सुखदेव डेरे यांच्यापर्यंत पोहोचले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टीईटी घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. 2018 साली झालेल्या टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात डेरे हे आरोपी आहेत.

त्यावेळी 500 पेपर मध्ये फेरफार झाल्याचा संशय असून यामध्ये आरोपींनी कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचे उघडकीस येत आहे. डेरे यांच्यामुळे संगमनेरसह नगर जिल्ह्यातील एजंट तपासाच्या रडारवर आले आहेत.