शिर्डी मतदारसंघाची विकास प्रक्रिया अविरतपणे ना. विखे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू- शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांचे प्रतिपादन

शिर्डी मतदार संघाच्‍या विकासासाठी ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी नेहमीच जातीधर्माच्‍या पलिकडे जावून विकास निधी उपलब्‍ध करुन दिला. या मतदार संघाची विकास प्रक्रीया अविरतपणे त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरु आहे.गुण्‍यागोविंदाने नांदणा-या या भागातील लोकांमध्‍ये दहशतीचा संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न बाहेरच्‍या लोकांनी येवून करु नये असा स्‍पष्‍ट इशारा शिर्डीचे माजी नगराध्‍यक्ष कैलासबापू कोते यांनी दिला आहे.

Published on -

शिर्डी मतदार संघाच्‍या विकासासाठी ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी नेहमीच जातीधर्माच्‍या पलिकडे जावून विकास निधी उपलब्‍ध करुन दिला. या मतदार संघाची विकास प्रक्रीया अविरतपणे त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरु आहे.

गुण्‍यागोविंदाने नांदणा-या या भागातील लोकांमध्‍ये दहशतीचा संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न बाहेरच्‍या लोकांनी येवून करु नये असा स्‍पष्‍ट इशारा शिर्डीचे माजी नगराध्‍यक्ष कैलासबापू कोते यांनी दिला आहे.

या संदर्भात प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकात कैलास कोते यांनी म्‍हटले आहे की, वर्षानुवर्षे या भागातील विकास प्रक्रीया सुरु आहे. शिर्डी शहर आणि परिसरातील गावांचा चेहरा मोहरा ना.विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने बदलत आहे.

परंतू या विकास प्रक्रीयेला गालबोट लावण्‍याचे काम महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडून जाणीवपूर्वक सुरु असल्‍याचा आरोप करुन, केवळ निवडणूकीच्‍या राजकारणासाठी येवून आमच्‍या या विकास कामांमध्‍ये अडथळा निर्माण करण्‍याचे काम करु नये.

या भागातील लोकांच्‍या सुख दुखात विखे पाटील परिवार कायम उभा असतो. आज मत मागण्‍यासाठी येणारी माणसं संकटात कुठेही उभी नसतात. या भागात जाणीवपूर्वक दहशत असल्‍याचा आरोप करुन एक प्रकारे शिर्डीच्‍या पावन भूमीकेला बदनाम करण्‍याचे कारस्‍थान विरोधकांकडून सुरु आहे.

ते आम्‍ही कदापीही सहन करणार नाही. खरी दहशत कुठे आणि कोणाच्‍या तालुक्‍यात आहे हे संपूर्ण राज्‍याने पाहीले. त्‍यामुळेच शिर्डी मतदार संघात दहशत असल्‍याचा विरोधकांचा आरोप हा पुर्णपणे निरर्थक‍ आणि व्‍यक्तिव्‍देशातून असल्‍याची टिका कोते यांनी आप्‍लया पत्रकात केली.

या भागातील युवकांच्‍या उज्‍वल भविष्‍यासाठी मंत्री विखे पाटील यांच्‍या पुढाकाराने औद्योगिक वसाहत निर्माण होत आहे. नागरीकांच्‍या सोयीकरीता अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी कार्यालय आणि शिर्डी शहराच्‍या वैभवा करीता थिमपार्क उभारणीचे काम मंत्री विखे पाटील यांच्‍या प्रयत्‍नातून होत असल्‍याकडे लक्ष वेधून कोते म्‍हणाले की, कोणतेही संकट आले तरी, विखे पाटील खंबीरपणे या भागातील लोकांच्‍या पाठीशी उभे राहतात.

कोणत्‍याही धार्मिक आणि जातीवादाची तेढ या भागात नाही. केवळ सर्व समाज घटकांचा विकास हेच उदिष्‍ठ ठेवून विखे कुटूंबियांचे सुरु असलेले काम आणि राज्‍याच्‍या राजकारणात ना.‍राधाकृष्‍ण विखे पाटील यांचे वाढत असलेले वर्चस्‍व विरोधकांना देखवत नसल्‍यामुळेच केवळ या मतदा संघाला बदनाम करण्‍याचे काम प्रचाराच्‍या निमित्‍ताने विरोधकांकडेन होत आहे. या खोट्या आणि निरर्थक प्रचाराला शिर्डी मतदार संघातील जनता बळी पडणार नाही असा ठाम विश्‍वास कैलास कोते यांनी व्‍यक्‍त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!