पारनेरमध्ये माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचा बंडाचा झेंडा कायम! पारनेरमध्ये महायुतीचे टेन्शन वाढणार का?

पारनेर- अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात दिसून आली असून या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून जे उमेदवार इच्छुक होते त्यांच्यापैकी माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली.

Ajay Patil
Published:
vidhansabha

Ahilyanagar News:- काल विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरांनी अपक्ष अर्ज मागे घेतले व जवळपास काल सर्वच मतदारसंघांमधील लढती निश्चित झाल्या. परंतु काही ठिकाणी बंडखोरांनी बंडाचे निशाण कायम ठेवल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नक्कीच डोकेदुखी वाढेल हे मात्र निश्चित.

अशीच काहीशी परिस्थिती पारनेर- अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात दिसून आली असून या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून जे उमेदवार इच्छुक होते त्यांच्यापैकी माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली.

तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी मात्र माघार घेतली व महायुतीला रामराम ठोकत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

पारनेरला बंडखोरांनी वाढवली डोकेदुखी
पारनेर- अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष विजय औटी हे इच्छुक होते व त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता हा अर्ज त्यांनी कायम ठेवत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

मात्र माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी मात्र माघार घेतली असून महायुतीच्या बाहेर पडत महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे. इतकेच नाही तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी देखील काल माघार घेतली. परंतु पुढील भूमिका त्यांनी अद्याप पर्यंत जाहीर केलेली नाही.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी सोमवारी खासदार निलेश लंके यांची पारनेर येथील संपर्क कार्यालयात भेट घेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांचे मात्र टेन्शन वाढले आहे. पारनेर मतदारसंघाचे विधानसभेत पंधरा वर्षे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार विजय औटी अनपेक्षितपणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना पाठिंबा दिला होता व महाविकास आघाडीतून ते बाहेर पडले होते. त्याच प्रकारे ते आता विधानसभेला देखील महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांना पाठिंबा देतील अशी एक अपेक्षा होती.

परंतु त्यांनी तसे न करता स्वतःची अपक्ष उमेदवारी कायम ठेवून एक प्रकारे महायुतीला धक्काच दिलेला आहे. महायुती प्रमाणेच महाविकास आघाडीला देखील या ठिकाणी झटका बसण्याची शक्यता असून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी देखिल बंडखोरी करत महाविकास आघाडीमध्ये देखील सर्व काही ठीक नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe