४ जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार – खा. डॉ. सुजय विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

४ जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार असून ४०० पारच्या माध्यमातून नवा इतिहास लिहला जाणार असा विश्वास महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. २०१४ प्रमाणे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीची लाट सरू असून या लाटेत विरोधकांचा सुपडा साफ होणार असे त्यांनी सांगितले. घोगरगाव व देऊळगाव येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार चांगलाच गाजत आहे. ठिकठिकाणी त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. गावोगाव पिंजून काढत असताना त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे काम सुरू आहे. मागील पाच वर्षात त्यांनी केलेली विकास कामे त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकात झालेली कामे हा त्यांचा प्रचाराचा अजेंडा आहे. विकास कामांच्या जोरावर ते मतदारांना आवाहन करत आहेत.

शनिवारी श्रिगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी घोगरगाव येथे सभा घेत रुईखेल, बागर्डे, तरणगव्हाण, चवरसांगवी, बनप्रिंपी, थिडे सांगवी या गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत युवा नेते विक्रमसिंह पाचपूते, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, अर्जून शेळके, सिद्धेश्वर देशमुख, बक्षुद्दीन शेख, राजेंद्र बेरड, घोगरगावचे सरपंच सुजाता भोसले, सुवर्णाताई भोसले, सचिन जगताप तसेच गावातील आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, २०४७ रोजी विकसित भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहेत. या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी ४ जून रोजी देशात पुन्हा भाजप आणि महायुतीचे सरकार येणार असून या स्वप्नाची पायाभरणी केली जाणार आहे. मागील १० वर्षातील मोदी सरकारने केलेल्या कामामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशवासियांचा विश्वास वाढला आहे. यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा आकडा सहज गाठता येणार आहे.

जिल्ह्यातही लोक नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणुन पाहू इच्छित आहेत. यामुळे राज्यातही महायुतीचा ४५ हून अधिक जांगावर विजय निश्चित आहे. निवडणुक अंतिम टप्प्यात असून पंतप्रधान मोदी यांचे क्रेज वाढत आहेत. तुम्ही दिलेला प्रतिसाद ही माझ्या विजयाची ग्वाही देत असल्याचे त्यांनी सांगितले.  श्रिगोंदा तालुक्यातील नागरिकांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.