सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंध देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. अहमदनगर मध्ये देखील सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीकडून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला जात आहे.
अशातच मात्र नगरमधून एक खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबाला लंके समर्थकांकडून मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. मयूर कदम या तरुणाने हा आरोप केला आहे.
मयूर यांनी सांगितल्याप्रमाणे, निलेश लंके यांची प्रचार फेरी सुरू असताना त्यांच्या कुटुंबियांना मारहाण झाली आहे. त्यांच्या आईला, त्यांच्या पत्नीला आणि बहिणीला निलेश लंके समर्थकांकडून मारहाण करण्यात आली आहे.
मयूर यांच्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे, ते शिवाजीनगरहून श्रीकृष्ण नगरकडे जात होते. पण श्रीकृष्ण नगर येथे निलेश लंके यांच्या प्रचारार्थ रॅली सुरू होती. यावेळी त्यांना मारहाण झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात मयूर नामक तरुणाने पोलिसात गुन्हा दाखल करू असे म्हटले आहे. एकंदरीत सध्या निवडणुकीचे वातावरण सुरू आहे आणि अशातच निलेश लंके यांच्या समर्थकांवर मारहाणीचा आरोप केला जात आहे.
यामुळे यावरुन आगामी काळात राजकारण तापण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान आता निलेश लंके या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतात हे देखील विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.