Ahmednagar Crime News | तीन दुकाने पेटवली, चार लाखांचे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Crime News : बालिकाश्रम रोडवर भूतकरवाडी चौकातील पंच्करच्या दुकानसह कपड्याचे ब चप्पलांचे दुकान कशाने तरी पेटविल्याने या दोन्ही दुकानातील चार लाखांचे नुकसान झाले.

याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात जळीताची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सुभाष गणपत साठे (रा. बुऱ्हाणनगर, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि.२५ मार्च रोजी सकाळी सहाच्या सुमारास कामगार मोहमंद शालम शेख (रा. सावेडी नाका) याने फोन करून सांगितले, . दुकान पेटलेले दिसत आहे.

तुम्ही लवकर या, मी लगेच दुकानाकडे गेलो. त्यावेळी दुकान जळालेले दिसले. दुकानामधील सर्व साहित्य जळालेले दिसले. तसेच दुकानाशेजारील सृष्टी पप्पु विधाते यांचे कपड्याचे व चप्पलांचे सूरज कलेक्शन दुकान देखील जळालेले दिसले.

तेव्हा आमची खात्री झाली की, आमच्या दोघांचे दुकान कशाने तरी पेटवून आमच्या दुकानातील साहित्य जळून नुकसान झाले आहे. माझे दोन लाख रूपयांचे तर सृष्टी विधाते यांचे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे साठे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.