Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा मतदारसंघ असून या ठिकाणी प्रामुख्याने काळे आणि कोल्हे यांच्यामध्ये प्रमुख लढत दिसून येते. परंतु यावेळी मात्र विवेक कोल्हे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे ही निवडणूक विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्यासाठी अतिशय सोपी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
परंतु असे असताना देखील आशुतोष काळे यांनी मात्र प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरू केला असून त्यांच्या प्रचारासाठी नुकताच कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात अल्पसंख्याक मेळावाचे आयोजन करण्यात आलेले होते व या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष आ.ईद्रीस नायकवडी हे उपस्थित होते.
आ. आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा
कोपरगाव शहराचा पाच वर्षात चांगला विकास झाला आहे व यापुढेही विकासाची ही गंगा अशीच वाहती ठेवायचे असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करणे खूप गरजेचे आहे व त्याकरिता कर्तबगार आमदार आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा अशा प्रकारचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष आ. ईद्रीस नायकवडी यांनी केले.
कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात आमदार काळे यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्यांक मिळवायचे आयोजन करण्यात आले होते व यावेळी नायकवडी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, राज्यातील जनतेकरिता महायुती सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना,
महिलांना मोफत एसटी प्रवास तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल सरसकट माफ करण्याचा निर्णय अशा प्रकारचे क्रांतिकारी निर्णय घेऊ शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे.
या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्व समाज घटकांचे हित जोपासण्याचे महत्त्वपूर्ण काम केले असून अशी दूरदृष्टी असलेल्या नेत्याकडून कोपरगाव मतदारसंघाचा जास्तीत जास्त विकास करून घेण्यासाठी आ.आशुतोष काळे यांना अल्पसंख्याक समाजाने भरभरून साथ द्यावी असे आव्हान देखील त्यांनी यानिमित्ताने केले.
यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले की, आतापर्यंत मतदार संघातील विकासासाठी अनेक कामे केलेली आहेत व यापुढे देखील मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार असून सर्व समाजासोबतच अल्पसंख्याक समाजाच्या अडचणी व प्रश्न सोडवले आहेत व यापुढे देखील माझे काम अखंडपणे असेच सुरू राहील असे देखील काळे यांनी म्हटले.